Categories: Editor Choice

Big Breaking : पिंपरी चिंचवडमध्ये यंदाही गणेशोत्सव साधेपणानंच … पालिकेची मार्गदर्शक नियमावली जारी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ऑगस्ट) : सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ बाबत दिनांक २९ जून २०२१ रोजी राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणेबाबत सूचित करण्यात आले आहे . या वर्षीचा गणेशोत्सव महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना यांचे काटेकोरपणे पालन करुन गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा असे पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटील यांनी म्हटले आहे.

कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार / राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार , अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील असे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दि . ०३.०८.२०२१ रोजी दिले आहेत .

 

▶️अशा आहेत सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ मार्गदर्शक सूचना :-

कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत .

१. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका / रथानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील .
२. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत . या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी .

३. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतींकरिता २ फूटांच्या मर्यादत असावी .
४. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे . मुर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे . विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे .

५. उत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा . जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे . तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी .
६. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे ( उदा . रक्तदान ) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना , मलेरिया , डेंग्यू इ . आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेव स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी .

७. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking tha Chain वावत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निबंध कायम राहतील . त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही .
८. आरती , भजन , किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गदी होणार नाही याची दक्षता घ्यावी . तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे .

९ . श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन , केबल नेटवर्क , वेबसाईट व फेसवुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी ,
१०. गणपती मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल रक्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी . प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे ( फिजिकल डिस्टन्सींग ) तसेच स्वच्छतेचे नियन ( मास्क , सॅनीटायझर इत्यादी ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे .

११. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत . विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांवावे . लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे . संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत . १२. महापालिका , विविध मंडळे , गृहनिर्माण संस्था , लोक प्रतिनिधी , स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमुर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी .

१३. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका , पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील . तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे .

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago