Google Ad
Editor Choice Education

न्याहरी : श्री संत तुकोबाराय विचारमाला शुभप्रभात पुष्प – ९० … दृढसंकल्प पूर्णत्वास न्यायचा असेल तर त्याला आपले मन साक्षी ठेवा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .३१जुलै २०२१) : शनिवार न्याहरी – भाग ९०

श्री संत तुकोबाराय विचारमाला तुका म्हणे साक्षी असो द्यावे मन । घातली ते आण पाळावया ।। ( अभंग क्र .१५८ वै.खांदारकर महा.गाथाभाष्य )

Google Ad

रामकृष्णहरि ! दृढ संकल्प पूर्णत्वास न्यायचा असेल तर त्याला आपले मन साक्षी ठेवा .

श्री तुकोबाराय म्हणतात बहुजन्मी केला लाग । तो हा भाग लाधलो ।। मोठ्या कष्ठाने मिळालेल्या मनुष्य जन्मात प्रत्येकाला काहीना काही प्राप्त करायचे आहे.कोणी मरे पर्यंत जगतो , तर कोणी मरणा नंतर ही जगत रहातो.जगात मरणा नंतर जगत रहाणार्यांन मध्ये ते महापुरूष असतात जे आपल्या हातुन दृढ संकल्पाचा सुकानु दूर जावु देत नाहीत .

मीच मज राखण झालो । ज्याने तेथेचि धरीलो ।।
स्वतःच स्वतःचं राखणदार झालं की दृढ संकल्पाच्या आड येणार्या विकल्पांना जिथल्या तिथं रोखता येतं . गति अधोगती मनाची हे युक्ती आयुष्याच्या वाटेत येणारे चढ – उतार हे सारे मनाचे खेळ असतात.म्हणून त्याने विचलित होवु नका . आपल्या मनालाच आपल्या संघर्षमय जीवनाचा साक्षीदार बणवा .

तुका म्हणे मने । हेचि संकल्प वाहणे ।। जय शिवराय ! ही शिदोरी इतरांना वाटा

राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा.डॉ गजानन महाराज वाव्हळ पणे मो.९ ७६५३८७०४०

Google Ad

About the author

Maharashtra14 News

781 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!