Categories: Editor Choice

भारतीय समाजवादी पार्टी आणि शारीरिक शिक्षण महामंडळ पिंपरी चिंचवड च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ऑगस्ट) : आज मल्लिकार्जुन मंदिर निगडी प्राधिकरण येथे भारतीय समतावादी पार्टी आणि शारीरिक शिक्षण महामंडळ पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

सकाळी दहा वाजता मल्लिकार्जुन मंदिर निगडी प्राधिकरण येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सौ सुनिता अशोक नगरकर यांच्या शुभ हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती शारीरिक शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख, उपाध्यक्ष मृदुला महाजन, कार्याध्यक्ष रफीक इनामदार ,सचिव महादेव फपाळ ,संचालक निवृत्ती काळभोर सर व मल्लिकार्जुन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर दलाल, उद्योजक बाळासाहेब नाकाडे ,सुरेश लिंगायत, अनंत शिंदाळकर , चंद्रकांत खोचरे ,सुधाकर कुंभार, पार्टी सचिव अभिजीत हांचे, पार्टी खजिनदार संगमेश्वर शिवपुजे ,सिद्धरमेश नवदगिरे, संतोष बिराजदार, शिवशरण बडदाळ, सिंधुताई नावदगिरे ,उद्योजक वैशालीताई घाटके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनीषा कलशेट्टी यांनी केले.

सध्याच्या करोनाच्या महामारीने समाजात अनेक लोकांना रक्ताची गरज आहे ही गरज लक्षात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत शिबिरात एकूण 43 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरास काँग्रेस नेते दिलीप पांढरकर यांनी सदिच्छा भेट दिली. उद्योजक बाळासाहेब नाकाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिराचा योग घडवून आणणारे बसवेश्वर कनजे यांनी उपस्थितांचे आणि रक्तदात्यांचे आभार मानले.

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

8 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

12 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

7 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago