Categories: Uncategorized

एकजुटीने संघटनात्मक बांधणी करुन पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार – नवनिर्वाचित भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जुलै) : आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला शत-प्रतिशत समर्थन मिळवून देण्यासाठी पक्षाचे शहरातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शंकर जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रमविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, आमदार उमा खापरे व राज्यातील पक्षाच्या इतर नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याबरोबरच शहरात पक्ष आणि भक्कम करून संघटना वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारतीय जनता पार्टी ही कोणतीही निवडणूक आव्हान समजूनच लढत असते. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. शहरातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करणार आहे.
आज लाेकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांची खूप आठवण हाेत आहे. त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे विकासवादी विचार पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांमध्ये रुजवले. शेवटच्या घटकाचा विकास हाच त्यांचा निर्धार हाेता. त्यांचा वारसा पुढे चालवण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. नवी जबाबदारी स्वीकारताना केंद्र, राज्य सरकारच्या आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कल्याणकारी याेजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पाेहाेचवणे आणि विकासकामांना गती देण्याचा संकल्प आहे.
सर्व पक्षश्रेष्ठी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, माजी अध्यक्ष, राज्य स्तरीय लेखा समिती सचिन पटवर्धन, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साेबतीने आणि एकजुटीने संघटनात्मक बांधणी करुन पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra14 News

Recent Posts

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

3 days ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

3 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

3 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

1 month ago