Google Ad
Uncategorized

पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढणार … पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ मार्च) : पुण्यातील भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. त्यामुळे पुणे लोकसभेचे विद्यमान खासदार होते, त्यांच्या निधनाने पुण्याची जागा रिक्त झाली आहे. ही जागा काँग्रेस लढणार असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

या जागेवर लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे. गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तसे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. पुण्यात कसब्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? अशी भीती भाजपमध्ये निर्माण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

Google Ad

पुण्याची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही. पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं. प्रत्येकवेळी भाजप लढली आहे. त्यामुळे आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!