Google Ad
Editor Choice

चंद्रकांत पाटील यांची काँग्रेसवर सडकून टीका … आपण करू ते तत्वज्ञान अन् दुसरे करतील तो घोडेबाजार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ डिसेंबर) : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी धूळ चारली. तर नागपूरमध्ये छोटू भोयर यांच्या जागेवर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना चित करून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले.

या विजयाचा आनंद भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रांत पाटील यांना पेढा भरवून साजरा करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. आपण करू ते तत्वज्ञान आणि दुसरे करतील तो घोडेबाजार, अशी काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे. विदाऊट मोदी या देशाचा विकास होणार नाही, हे लोकांना समजले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घ्या, मग तुम्हाला समजेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Google Ad

चंद्रकांत पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन जागांच्या निवडणुका झाल्या. मात्र, काँग्रेसने शब्द देऊनही तो पाळला नाही. त्यामुळे निवडणूक झाली. चंद्रशेखर बावनकुळे खूप मोठ्या फरकाने विजयी झाले. दोन्ही विजेत्यांचे अभिनंदन करतो. शिर्डीच्या साईबाबाचे वाक्य आहे. श्रद्धा आणि सबुरी. याचा आम्हाला फायदा झाला. काँग्रेसने या निवडणुकीत पोरखेळ केला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!