महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ ऑक्टोबर) : राज्यत्वराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडल्याने अनेक ठिकाणची राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचे पारडे शिंदे गटाच्या तुलनेत जड असल्याचे दिसत आहे.त्यानुसार राजकीय नेते आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पावले टाकू लागले आहेत. आता पिंपरी चिंचवडमधून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.
राज्यात निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे, त्यातच पिंपरी चिंचवड मधील भाजपचे जुन्या फळीतील एकनिष्ठ एकनाथ पवार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे खंदे समर्थक मानले जातात ते आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची पिंपरी चिंचवड शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे, त्यांच्या पक्ष सोडण्याचा मोठा फटका भाजपला शहरात विधानसभा आणि महापालिका निवडणुकीला बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी २०१४ ला भोसरीतून विधानसभा लढवून ५२ हजार मते घेतली होती. 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या प्रभागातून चारही भाजपचे नगरसेवक विजय झाले होते. दोन वर्ष त्यानी महापालिकेत सभागृह नेते म्हणून उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे विधानसभेला भोसरीत त्यांच्या उणिवेचा फटका भाजपला बसणार आहे. तो जास्त महापालिका निवडणुकीला जाणवेल.
पिंपरी-चिंचवडमध्ये इनकमिंग, आउटगोइंग सुरू झाले असल्याचे दिसायला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे माजी सभागृह नेते तथा प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. येत्या २५ तारखेला मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे भाजपला पिंपरी चिंचवड शहरात मोठा धक्का बसणार असून, आगामी काळात पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचा बालेकिल्ला असणारे निवडणुकांचे समीकरण बदलणार असल्याचे लवकरच पहायला मिळेल.
मोदी लाटेत एकनाथ पवार यांनी २०१४ साली भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती. आमदार म्हणून निवडून आलेले महेश लांडगे यांनी भाजपकडून आपली जागा आबादीत ठेवली, त्यामुळे भोसरीतून विधानसभेला इच्छुक असलेल्या एकनाथ पवारांना तिकीट मिळण्याची आशा मावळली असे म्हणायला हरकत नाही, त्यांना ‘संधी’ राहिली नसल्याने त्यांनी गावाकडे मराठवाड्यात लोहा-कंधार मतदारसंघातून लढण्याची मोठी तयारी त्यांनी सुरू केली आहे. लोहा कंधार मध्ये शेकाप खालोखाल शिवसेनेचे प्राबल्य आहे, त्यामुळे विचारधारा एक असलेल्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश करायचे ठरवले आहे. संदर्भात त्यांच्याशी संपर्क केला असता, पावर हे अंतरवाली सराटि येथे मराठा आरक्षणाच्या सभेस गेले असून, ते आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.