Categories: Editor Choice

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्राणज्योत मालवली

महाराष्ट्र 14 न्यूज,( दि. ३ जानेवारी) :  – पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. शहराच्या राजकारणातील ढाण्या वाघ गेल्याची भावना गेल्याची भावना व्यक्त होत आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.

(आज दुपारी ०२ ते ०५ वा. अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी तर अंत्यसंस्कार सायंकाळी ०५.३० वाजता पिंपळे गुरव येथे होणार आहेत.)

शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळी नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले. आमदार जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. आता जगताप यांच्यासारखा मोठा आधारस्तंभ निखळल्याने भाजपाला पोरकेपण आले आहे.

आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आले. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्ती मुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील स्थानिक दमदार आमदार म्हणून लक्ष्मणभाऊ यांच्याकडे पाहिले जायचे. १९८६ मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. नंतर स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली. सन २००० मध्ये ते शहराचे महापौर होते. पुढे हवेली विधानसभेसाठी प्रबेळ दावेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते, पण विलास लांडे यांना संधी मिळाली होती. नंतर विधान परिषदेसाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकित अपक्ष उमेदवारी करून त्यांनी काँग्रेसचे चंदूकाका जगताप यांचा पराभव केला होता. राज्यात ती निवडणूक खूपच गाजली होती. २००९ मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी करून शिवसेनेचे आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला आणि विजयश्री खेचून आणली होती. नंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून त्यांनी अत्यंत कडवी झूंज दिली, पण तिथे श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून विजयी झाले. नंतरच्या काळात बदलती राजकिय समिकरणे लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडून सरळ भाजपामध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभेतून आमदारकी केली. २०१९ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि चौथ्यांदा आमदार झाले. २०१७ मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमदार जगताप यांचे नाव मंत्री पदासाठी आघाडीवर होते. आता त्यांच्या निधनामुळे भाजपा पुढे नेतृत्वाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या निधनावर सर्व राजकिय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

सांगवी येथील गणेश को-ऑपरेटिव्ह बँक, न्यू मिलेनियम स्कूल, प्रतिभा कॉलेज ऑफ सायन्स एन्ड कॉमर्स आदी संस्थांचे ते संस्थापक होते. पतंजली संस्था, हरिद्वारचे ते संस्थापक सदस्य होते. शहरातील अनेक संस्था, संघटनांचे ते आधारस्तंभ होते.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे …. प्रकल्प अहवालाचे सादरीकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रस्तावित…

19 hours ago

प्रेक्षकांची मने जिंकणारी हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन

'महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31ऑगस्ट  :- या सुखानो या' म्हणत टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकलेली आणि आपल्या अभिनय…

2 days ago

आझाद मैदानात पोलीस छावणी, हजारो पोलिसांचा बंदोबस्त… मराठा आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानात ठिय्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28ऑगस्ट :-- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंंदोलक…

5 days ago

पिंपळे गुरव येथे श्री गजानन महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी व ऋषी पंचमी उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28 ऑगस्ट : पिंपळे गुरव येथील श्री गजानन महाराज यांची ११५ वी…

5 days ago

२५० बेड क्षमतेसह पिंपरी चिंचवड मनपाचे तालेरा रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज!

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ ऑगस्ट २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना सक्षम आणि…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम जलकुंडाची सोय

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…

7 days ago