Google Ad
Editor Choice

चिंचवड विधानसभेकरीता भाजप कडून शंकर जगतापांची फिल्डिंग … तर बंडखोरांचे काय होणार ? जनतेत चर्चा !

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१५ ऑक्टोबर) : आज (दि.१५ ऑक्टोबर) महाराष्ट्र राज्याची निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विविध मतदारसंघातील नेते, इच्छुक तयारीला लागले आहेत. अशातच घराणेशाही आणि निवडणूक याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला लागल्याचे चित्र राज्यात दिसत आहे.अशातच आता प्रत्येक ठिकाणी विरोधक एकवटले आहेत.

राज्यात जवळपास सर्वात मोठा असलेला चिंचवड मतदार संघ ही त्याला अपवाद नाही. अशातच चिंचवड विधानसभेसाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नावावर पक्षाच्या कोअर कमिटीत अंतिम शिक्कामोतर्ब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे ‘चिंचवडचा विधानसभेचा मीच दावेदार’ म्हणवणाऱ्या इच्छुकांची गोची झाली असून, भाजपकडून चिंचवडची उमेदवारी मागणाऱ्या पक्षातील बंडोबांना वरिष्ठ कसे थंड करतात? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे चिंचवड मतदार संघात राजकीय वर्तुळातही उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Google Ad

स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांच्या नियोजन बद्ध व्युव्हरचनेने सहज विजय झाला. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची राजकीय रणनीती तसेच त्यांच्या सोबत असणारे विश्वासू शिलेदार यांच्या प्रयत्नामुळे पोटनिवडणुकीत विजय अगदी सोपा झाला.

चिंचवड मतदारसंघावर जगताप कुटुंबाचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे. चिंचवड मतदार संघात पिंपळे सौदागर, वाकड थेरगाव, चिंचवडगाव, रावेत, सांगवी, नवी सांगवी , पिंपळे गुरव, किवळे- मामूर्डी, पुनावळे हा उच्चभ्रु आणि आयटीयन्सचा मोठा भाग या मतदारसंघात येतो. लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी शहर अध्यक्ष असताना नेहमी बेरजेचे राजकारण करत संपुर्ण शहराचा विकास केला, त्याच बरोबर आपल्या बरोबर असणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना मोठमोठी पदे देऊन नगरसेवक, स्थायी समिती विविध प्रकारच्या समित्या देऊन त्यांचाही विकास केला हे सर्व शहरतील जनता जाणते, यातीलच काहीजण जगताप कुटुंबाच्या विरोधात शड्डू ठोकण्याची चाचपणी करताना दिसत आहेत, परंतु शांत, संयमी, सुशिक्षित आणि संघटनात्मक कौशल्य असणाऱ्या शंकर जगताप यांच्या नावाला जनतेची पसंती असताना दिसत आहे. संघाचे स्वयंसेवक व भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट जगताप यांचे काम सुरू केल्यामुळे व लोकसभा निवडणूकीत आप्पा बारणे यांना चिंचवड विधानसभेतून तब्बल ९६ हजार मतांचा लीड मिळाले त्याचे श्रेय बारणे यांनी शंकर जगताप यांना दिले, जनतेचा महायुतीला मिळणारा प्रतिसाद पाहून जगताप विरोधकांची पंचायत झाली आहे. त्यामुळे चिंचवड मधील बंडखोरांची सुरू असलेली खेळी कितपत यशस्वी होतेय ये येणाऱ्या 23 नोव्हेंबर ला कळून येईल.

मतदार संघात झपाट्याने झालेल्या विकासकामांमुळे जगताप कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग चिंचवड मतदार संघात आहे. त्यामुळे जनतेला आपले काम करणारा आणि सर्वसामान्य माणसाचा सन्मान करणारा नेता पाहिजे असतो आणि लक्ष्मण जगताप यांच्या तालमीत तयार झालेल्या शंकर जगताप यांच्यात ते कसब आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता शंकर जगताप यांना लक्ष्मण जगताप यांच्या रूपाने पाहणार असे चित्र सध्या तरी मतदारसंघात दिसत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!