Google Ad
Editor Choice

भाजप नगरसेविका यांचे पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार पुणे शहरातील औंध परिसरात उघडकीस!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०१जुलै) : भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या रहिवाशाला मारहाण केल्याचा आरोप आहे. पुणे शहरातील औंध परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. औंधच्या भाजप नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती मधुकर मुसळे आणि भावावर मारहाणीचा आरोप आहे.

भाजप नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुसळे या औंध परिसरातील क्लोरियन पार्क या इमारतीत वास्तव्यास आहेत. मारहाण झालेली व्यक्तीही याच इमारतीत राहत असल्याची माहिती आहे.

Google Ad

सोसायटीत आपली बदनामी करणारी पत्र का वाटली? त्यावर तुझीच सही आहे ना?” असा जाब मुसळे विचारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ मारहाणीसोबतच शिवीगाळ झाल्याचंही ऐकू येत आहे. तर “मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही. सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये मी सांगेन” असं संबंधित रहिवासी बोलताना ऐकू येतं.

दरम्यान, याबाबत पुण्यातील चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!