Categories: Uncategorized

अभिमानास्पद : भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑगस्ट) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ०१ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दीपक टिळक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला.

त्याच्याआधी पंतप्रधान मोदी यांचे आज सकाळी पुण्यात आगमन झाले. यावेळी त्याच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कृषी महाविद्यालय परिसरातील हेलिपॅडवर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्वागत केले. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भाजप शहराध्यक्ष ‘शंकर जगताप’ यांनी देखील त्यांचे स्वागत केले.

शंकर जगताप हे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष झाल्यानंतर हे पहिल्यांदा केललं स्वागत आहे. तर या स्वागतानंतर पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे श्रीं’ची आरती आणि अभिषेकसाठी गेले. तर यानंतर त्याना टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला. तर यानंतर त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे आणि पुणे पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रकल्पांचे उद्धाटन देखील केले.

Maharashtra14 News

Recent Posts

आकुर्डी येथे माणुसकी पूर्णपणे संपली असल्याचे चित्र … नेपाळ धुमसत असताना एका नेपाळी तरुणाकडून मुक्या प्राण्याची तलवारीने निर्दयीपणे हत्या.!!!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…

4 days ago

सभासदांना १५% लाभांश देत, आमदार शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणेश सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…

5 days ago

पायलट लायसन्स सेमिनार २१ सप्टेंबरला … पायलट होण्याची सुवर्णसंधी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…

6 days ago

जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं

जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…

1 week ago