Categories: Uncategorized

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड मधील यशस्वी उद्योजक श्री.बबनराव येडे आबांना अमृत महोत्सवी वर्षाच्या दिल्या शुभेच्छा…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील  पिंपळे निलख येथील उद्योजक श्री.बबनराव बाबुराव येडे यांचा आज 75 वा वाढदिवस (अमृत महोत्सव) त्यांच्या जुन्या मित्र परिवारासोबत जुन्या आठवणींत साजरा करण्यात आला. अत्यंत संघर्षमय वाटचालीतून सुरु झालेला येडे आबांचा यशस्वी प्रवास खरच प्रेरणादायी आहे.एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र आहे.

आज त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी रहाटणी येथील थोपटे हॉल येथे मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. आबांच्या या सोहळ्याला शंकर जगताप यांनी उपस्थित राहून अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना केली.

यावेळी शंकर जगताप यांच्या समवेत ह.भ.प. श्री.भगवान कोकरे महाराज, भाषाप्रभू पंकज महाराज गावडे, माजी आमदार विलास लांडे पाटील, अभिनेते मकरंद अनासपुरे,  गोसेवक वारकरी भूषण श्री.विजूशेठ जगताप, ह.भ.प. श्री.बाळासाहेब काशीद, राजेंद्र राजापुरे, संजय वाबळे, श्री.गणेश सोनावणे, अॅड दिलीप करंजुले, श्री.भूषण तुपे, श्री.गणेश कस्पटे, श्री.संतोष लहाणे आदी उपस्थित होते.

▶️श्री. बबनराव बाबुराव येडे पाटील यांचा जीवन प्रवास :

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात जळगाव सुपे या लहानशा खेड्यात आई अनुसया व वडील बाबुराव यांच्या पोटी तुमचा जन्म झाला.

तुम्ही दोन भाऊ व दोन बहिनी असा तुमचा शेतकरी परिवार वडिलांच्या प्रेरणेने तुम्ही गुणवडी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे धडे घेवू लागलात तेथे तुम्ही ली ते ७ वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करून शिक्षणाची आवड जोपान्सून पुढील शिक्षणासाठी बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेतून जुनी मॅट्रीक परिक्षा उत्र्तीण झालात. तदनंतर घरच्यांच्या आग्रहामुळे आपला विवाह सौ. मालन (नानी) वांच्याशी झाला तरीही आपण विवाहनंतर औंध येथे आय.टी.आय.चे शिक्षण पूर्ण केले. भाणि लगेचच कुपन कंपनी येथे तुम्ही अॅपरंटीन्सशीप ३ वर्षे नोकरी केली.

दरम्यानच्या काळात तुमच्या वैवाहीक जीवनाची सुरुवात झाली होती. आपण बारामती येथून पिंपरी गाव या ठिकाणी भाश्याच्या खोलीत आपले संसार सुरु केला. आपल्या संसाररुपी वेलीवर

सुनिल आणि वैशाली ही दोन फुले उमलली.

कुपर कंपनीची नोकरी सोडून टेल्को वा मोठ्या कंपनीत नोकनी सुरु केली. टेल्को कंपनीची नोकरी सुरु असताना तुमच्यातील व्यावसायिक वृत्ती तुम्हास गप्प बसू देत नव्हती. आणि १४ वर्षाची नोकरी सोडून आपण १९८९ रोजी आपण एक छोटसा वर्क शॉप सुरु केला. त्यानंतर राजीनामा देवून पुर्ण वेळ व्यावसाय सुरु केला. आणि आज ७० ते ८० कामगारांना रोजगार देऊन त्यांची उपजिविका भागवत आहात.

अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत सरकारची चांद्रयान मोहिमेसाठी लागणारा एक छोटासा पार्ट गोक्रेज कंपनी मार्फत बनविण्याचा बहुमान तुमच्या वर्क शॉपला व तुम्हाला मिळाला १० बाय १० च्या खोलीत सुरु केलेला व्यावसाय आज १०० लोकांची कंपनी तुमचा मुलगा सुनिलब्या सहकार्याने सुरु आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.

आबा आपण शेतकरी कुटुंबात जन्मलेले असल्यामुळे आजही आपण शेती व्यवसाय जोपासत आहात. तुमचा दिनक्रम पहाटे ५.०० वाजता सुरु होतो सकाळी उठून आपण व्यायाम, योगा, प्राणायाम यासारखा व्यायाम करता व रोज सकाळी न चुकता उद्यानात फेरफटका मारत व सर्वांशी मिळून मिसळुन वागणे हा आपला स्थायी स्वभाव, हसतमुख व निरोगी असणारे तुम्ही कोरोना काळात वयाच्या ७२ व्या वर्षी तुम्ही, मुलगा सुनिल, नातु रोहन पुणे ते बारामती ही सायकल वारी सुध्दा पूर्ण केली. आपण दरवर्षी कुलदैवत जेजुरीचा खंडोबा याठिकाणी श्रवण महिन्यात आणि दत्तजयंती निमित कासारवाडी येथील दत्त मंदिरात हजारो भाविकांना अन्नदान करता. सामाजिक व सांप्रदायिक जीवनात आपला वावर हा वाखाण्या जोगा असतो.

Maharashtra14 News

Recent Posts

जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक रक्तदाता दिवस साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जून) :रक्तगटाचा शोध लावणारे ऑस्ट्रीयन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांच्या जयंतीनिमित्य सन…

16 hours ago

चिंचवड मतदारसंघातील विजेच्या प्रश्नासंदर्भात शंकरभाऊ जगताप यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२३ जून) : चिंचवड मतदारसंघातील विजेच्या प्रश्नासंदर्भात शंकरभाऊ जगताप यांनी महावितरणच्या…

4 days ago

जागतिक योग दिन जिल्हा आयुष रुग्णालयात उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : औंध जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या जिल्हा आयुष रुग्णालयात आज २१…

5 days ago

पिंपरी चिंचवड मनपाच्या सुरक्षारक्षकांनी भाजीविक्रेत्या महिला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण…

1 week ago

नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे नवी सांगवीत जेष्ठ नागरिक अरुण चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : विज्ञान युगाच्या चर्चा करत असताना भौतिक सुखासाठी होणारी प्रचंड…

1 week ago