Google Ad
Editor Choice Maharashtra

Jalna : लाचखोर डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षकाची भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण … प्रकणाची चौकशी होणार

महाराष्ट्र 14 न्यूज : जालना जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची तोडफोड केल्यामुळे भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले असा पोलिसांनी मारहाण केलेल्या युवकाचे नाव आहे. कोविड रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यामुळे संतप्त जमावाने रुग्णालयावर धावा बोलून रुग्णालयाची तोडफोड केली.

रुग्णालयात पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांसोबत हुज्जतही या कार्यकर्त्याने घातली. त्यामुळे पोलिसांनी काठीचा वापर करुन कार्यकर्त्याला बेदम मारले होते या मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यामुळे ही घटना अधिकच चर्चिली गेली आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Google Ad

भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले आणि इतर कार्यकर्त्यांना जालन्यातील रुग्णालयात जाऊन तोडफोड केली होती. ९ एप्रिलला एका युवकाचा अपघात झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामुळे डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरुन रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. हे रुग्णालय कोविड सेंटर होते यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत तोडफोड करणाऱ्या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

जमावाने पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर संतप्त पोलिसांनी युवकांवर लाठीमार केला. यामध्ये भाजप कार्यकर्त्याला पोलिसांच्या हातामधली काठी तुटेपर्यंत मारण्यात आले. ही घटना ९ एप्रिल रोजीची आहे. जवळपास दीड महिन्यानंतर या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे हे प्रकरण आता चांगलेच पेटले आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलिस अधीक्षक एसपी देशमुख यांच्याकडे केली आहे.

किरिटी सोमैया यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले, जालना यांना दीपक हॉस्पिटल येथे ९ एप्रिल रोजी पोलिसांनी मारहाण केली, त्याचा व्हिडिओ आत्ता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ह्या प्रकरणात आज पोलिस अधीक्षक एसपी देशमुख यांच्यासोबत बोललो, त्यांनी चौकशी करण्याचे मान्य केले आहे. अशी माहिती किरीट सोमैया यांनी दिली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!