Categories: Editor Choice

सर्वात मोठी बातमीः राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे नॉच रिचेबल, जळगावात खळबळ, काय घडतंय?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जानेवारी) : राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वच्या घडामोडी घडत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP ) बडे नेते एकनाथ खडसे यांचं वृत्त समोर आलं आहे.

गेल्या ८ दिवसांपासून एकनाथ खडसे नॉच रिचेबल आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एरवी सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी सदा सर्वकाळ फोनवर अगदी सहज उपलब्ध असणारे एकनाथ खडसे काही दिवसांपासून गायब आहेत. त्यांचा फोनदेखील लागत नसल्याची तक्रार सामान्य कार्यकर्ते करत आहेत.

एकनाथ खडसे यांचा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला नाही. असं पहिल्यांदाच घडल्याच घडतंय, अशीही माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांचे दोन्ही फोन नंबर्स नॉट रिचेबल असल्याचं समोर आलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाची घडामोड समोर येतेय का, याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.

एकनाथ खडसे मुंबईत असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र फोनवर संपर्क होऊ शकत नसल्याने जळगावातील त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

▶️नाथाभाऊ राष्ट्रवादीतही अस्वस्थ?

जळगाव जिल्ह्यातील बडे प्रस्थ असलेले एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे राजकारणी आहेत. मुक्ताई नगरातील ते आमदार असून त्यांनी महाराष्ट्राचं महसूल मंत्रीपदही भूषवलं आहे.
2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली.
2014 मध्ये ते महसूल मंत्री तसेच कृषीमंत्रीही बनवले.
2020 मध्ये भारतीय जनता पार्टीतील मतभेद आणि अस्वस्थतेमुळे त्यांनी २१ ऑक्टोबर रोजी भाजपा सोडली.
23 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2016 मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपल्यावर खोटे आरोप केल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. तेव्हापासून गिरीश महाजन एकनाथ खडसे यांच्यातील वाद आणखीच उफाळून आले.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या पक्षातही त्यांना फार मोठी संधी मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या पक्षातही ते नाराज असल्याची चर्चा आहे.

मागील आठ दिवसांपासून ते नॉट रिचेबल असल्याचं वृत्त हाती आल्याने जळगावातून आणखी काही मोठी अपडेट हाती येतेय का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

2 days ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

1 week ago

जीवनात प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून भंडारा डोंगर येथील मंदिर उभारणीसाठी एक कोटींची देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ :  जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…

3 weeks ago

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…

3 weeks ago