Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Chandrapur : शीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा … अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेच्या विषाचा वापर!

महाराष्ट्र 14 न्यूज : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येमुळे अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अशात आता त्यांच्या आत्महत्येविषयी महत्त्वाचा उलगडा समोर येत आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जे इंजेक्शन टोचून शीतल आमटे यांनी आत्महत्या केली ते विष अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी माहितीनुसार, डॉ. शीतल आमटे यांच्याशी नजिकच्या काळात संभाषण झालेल्या 90 % लोकांशी चौकशी पूर्ण झाली आहे. यानुसार आता पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने हाती घेतल्यामुळे यामध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहे.

अधिक माहितीनुसार, डॉ. शीतल यांचे निकटचे कुटुंबीय, नोकर, घरगुती मदतनीस यांचीदेखील चौकशी पुर्ण झाली आहे. इतकंच नाही तर डॉ. शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने मुंबईतील IT तज्ज्ञांकडे पाठवला आहे. यातील काहींमध्ये सॉफ्टवेअर लॉक असल्याचंही सांगण्यात येत आहे. या तपासामध्ये विषारी इंजेक्शन घेत शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.

Google Ad

नेमकं त्यांनी कोणतं विष घेत आत्महत्या केली याबाबत पोस्टमोर्टमच्या सविस्तर अहवालात माहिती स्पष्ट होईल. विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी अद्यापही पोस्टमोर्टम अहवाल जाहीर केला नाही. दरम्यान, शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतलं. त्यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यापूर्वीच शीतल यांची प्राणज्योत मालवली.

शीतल आमटे आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांनीदेखील त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली आहे. ‘डॉ. शीतल आमटे-करजगी यांचं अत्यंत धक्कादायक असं निधन झालं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

62 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!