या कार्यक्रमात महायुतीचे तिन्ही नेते एकत्र होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी कित्येक योजनांचा पाढा वाचुन दाखवला. तर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सगळ्या अटी काढून टाकल्या असुन आता रेशन कार्डाची अट नाही. उत्पन्नाची अट नाही. असं फडणवीसांनी सांगितले.
मात्र, अद्याप दोन्ही योजनांचा डोलारा अवघ्या ९९७ रुग्णालयांवर (सोलापूर जिल्ह्यातील ५० रुग्णालये) असून त्या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही सुरु न झाल्याने रुग्णांना पदरमोड करूनच महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.राज्यातील जिल्हा, उपजिल्हा, शासकीय वैद्यकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, आपला दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये सद्य:स्थितीत दरमहा दीड कोटी रुग्ण उपचार घेतात. त्या प्रमाणात त्याठिकाणी सोयी-सुविधा नसल्याचे अनेक दुर्घटनांमधून उघड झाले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार घेता यावेत म्हणून राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून साडेनऊशे आजारांवर तीन लाखांपर्यंत तर आयुष्यमान भारत योजनेतून एक हजार ३५६ आजारांवर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आत्तापर्यंत आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये दोन लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे आणि तो सातत्याने रोज वाढतो आहे. त्यामुळे जे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत विविध योजना पोहचवणं त्यांना अधिक सक्षम करणं हा प्रयत्न सातत्याने आपला चाललाय. खरं म्हणजे आपला भंडारा जिल्हा हा एकीकडे निसर्ग अतिशय वैविध्यपूर्ण असा जिल्हा केलाय. हा तलावांचा जिल्हा आहे. हा जंगलांचा, वनांचा जिल्हा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेले लोकं या जिल्ह्यामध्ये आपल्याला शेतकरी पाहायला मिळतात. आणि हा धनाचा जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात याठिकाणी धानाची शेती केली जाते. मला कल्पना आहे की यावेळी काही भागामध्ये त्याठिकाणी प्रादुर्भाव झालाय. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्या ठिकाणी आमचं धान नष्ट झालं असेल त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आवश्यक ती सगळी मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातनं निश्चितपणे याठिकाणी केली जाईल. हा विश्वास मी आपलं देऊ इच्छितो हे सरकार शेतकऱ्यांना समर्पित सरकार आहे.”
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…