Google Ad
Editor Choice Education

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८जून) : मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एसईबीसी आरक्षण कोट्यातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना निवडावा लागणार ईडब्लूएस पर्याय निवडण्या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गाऐवजी आता ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. उमेदवारांकडे खुल्या प्रवर्गाची निवड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रवर्ग निवडीबाबतचं परिपत्रक काढलं असून 23 जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल.

12 परीक्षांसाठी प्रवर्ग बदलावा लागणार

Google Ad

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत डिसेंबर, २०१८ नंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरुन सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षित पदांच्या आधारे भरतीप्रक्रिया राबवली होती. त्या भरतीप्रक्रियेच्या विविध टप्प्यावर प्रलंबित असलेल्या व शिफारशी करण्यात न आलेल्या केवळ एकूण 12 संवर्ग/परीक्षांच्या बाबतीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून अर्ज केलेल्यासंबंधित उमेदवारांना अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापैकी कोणता लाभ घ्यावयाचा आहे याची निवड करायची आहे.

▶️परीक्षेचे नाव

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019

पशुधन विकास अधिकारी, गट-अ

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020

सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020

सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त, गट-अ

मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गट ब

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020

वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ आदिवासी विकास विभाग

अनुवादक (मराठी), गट-क

प्रवर्ग निवडणार नाही त्यांना खुला प्रवर्गात ग्राह्य धरणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांनी आयोगाच्या दिनांक ४ जानेवारी, २०२१ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकास अनुसरुन कोणत्याही पदभरती/परीक्षांकरीता यापूर्वी प्रवर्ग निवडला असला तरी मराठा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नव्याने प्रवर्ग निवडावा लागेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!