Google Ad
Editor Choice

भारतीयांकरीता मोठी बातमी … भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान

महाराष्ट्र 14 न्यून, (दि.२४ ऑक्टोबर) : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदावरील दावा फेटाळण्यात आल्यानंतर भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व स्वीकाले. त्यानंतर त्यांची सायंकाळी पंतप्रधान म्हणून घोषणा झाली.

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. केवळ दीड महिन्याच्या कालावधीत 45 दिवसांत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. लिझ ट्रस या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधी लाभलेल्या पंतप्रधान ठरल्या. त्यानंतर झालेल्या निवडीमध्ये सुनक पंतप्रधान झाले आहे.

Google Ad

काही दिवसापूर्वी लिझ ट्रस यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा सुनक याना संधी मिळाली. सुनक यांच्या रुपाने ब्रिटनमध्ये पहिल्यादांच भारतीय वंशाचा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे ही भारतासाठीही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!