Google Ad
Editor Choice Pune

मोठी बातमी ! पुण्यात संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, नवी नियमावली जारी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६जून) : महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. पुण्यात महापालिकेने आता पुन्हा नवी नियमावली जारी करत निर्बंध लागू केले आहेत. आगामी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका धोका लक्षात घेऊन ही संबंधित कारवाई केली जात आहे. पुणे महापिलाकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी नवी नियमावली जारी केली आहे. याबाबत महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन माहिती दिली.

पुण्यातील नव्या नियमावलीत नेमके नवी नियम काय?

Google Ad

1) नव्या नियमावलीनुसार पुण्यातील दुकानांची वेळ आता घटवण्यात आली आहे. आता पुण्यातील दूकानं ही संध्याकाळी 4 पर्यंतच उघडी ठेवावी लागणार आहेत. संबंधित नवे नियम हे सोमवारपासून (28 जून) लागू होणार आहे.

2) नव्या नियमावलीनुसार पुण्यातील उद्याने हे सकाळी 7 ते 9 पर्यंतच खुली राहणार आहेत.
3) हॉटेल व्यवसायिक संध्याकाळी 4 नंतर फक्त पार्सल व्यवस्था सुरु ठेवू शकणार आहेत.
4) पीएमपी वाहतूक सेवा 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे.
5) पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू

गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल (25 जून) पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.

निर्बंध शिथिल केल्यानंतर पॉझिटिव्हिटी दरचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे तो आणखी वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे तूर्तास जे निर्बंध लागू आहेत तेच पुढे लागू राहतील, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. तसेच शाळा- कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद असतील, असंही नमूद केलं.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “पुणे जिल्ह्यात लसीकरण वेगानं सुरु आहे. परदेशात तिसरी लाट फार वेगाने वाढलीय आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लोक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडताहेत हे थांबलं पाहिजे. लहान मुलांना धोका जास्त असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

62 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!