पिंपरी चिंचवड पुन्हा लॉकडाऊनच्या वाटेवर ? काय आहेत, सोमवारपासून नवे नियम , जाणून घ्या!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२७ जून) : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात कोविड १९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत . महाराष्ट्र राज्याचा कोव्हिड १९ चा धोका कायम असल्याने तसेच डेल्टा , डेल्टा प्लस हा कोविड १९ विषाणूचा नवीन प्रकार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आढळून आलेला असून त्याचा प्रसार होत असून लवकरच ( ०४ ते ०६ आठवडे ) मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर अधिक घातक रूपात कोव्हिडची तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे . महाराष्ट्र शासनाने सूचित केल्यानुसार डेल्टा , डेल्टा प्लस हा व्हेरिएंट चिंतेचा विषय ( व्हेरिएंट ऑफ कन्सर्न – व्हीओसी ) आहे . या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सामान्यतः आणखी कठोर बंधने लागू करण्याबाबत पिंपरी चिंचवड शहरात आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

▶️कोविड १९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी २८ जून पासून असे आहेत, सुधारित आदेश :

१ ) अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) यामध्ये खालील सेवांचा समावेश असेल .
रुग्णालये , डायग्नोस्टिक सेंटर , क्लिनिक्स , लसीकरण ( Vaccination ) , वैद्यकीय विमा कार्यालय , फार्मासीज व फार्मासिटीकल कंपनी , इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा , त्यास सहाय्य करणारे उत्पादन व वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतूक व पुरवठा करणा – या आस्थापना , लस , सॅनिटायझर , मास्क , वैद्यकीय साहित्य व उपकरणे , कच्चा माल उत्पादन व पुरवठा करणारे व त्यांच्याशी निगडीत सर्व सेवा पशुवैद्यकीय दवाखाने , पाळीव प्राणी संगोपन केंद्र , पाळीव प्राणी खाद्याची दुकाने वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरणाशी संबंधित कामे विमानसेवा व त्याच्याशी संबंधित सेवा किराणा , भाजीपाला , फळविक्रेते , डेअरी , बेकरी , मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने , मटन , चिकन , अंडी , मासे विक्रीची दुकाने . शीतगृह आणि गोदाम सेवा ( Cold Storage and Warehousing ) सार्वजनिक वाहतूक – टॅक्सी , रिक्षा , रेल्वे , विमान सेवा , सार्वजनिक बस वेगवेगळ्या देशांचे राजदूत यांची कार्यालये . पुर्व पावसाळी नियोजित कामे स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणा – या सार्वजनिक सेवा . रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणीन घोषित केलेल्या सेवा सेबी तसेच सेबीची कार्यालये व त्यांच्याशी संबंधित सेवा देणारी कार्यालये

दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा . मालवाहतूक पाणीपुरवठा सेवा कृषी संबंधित सेवा आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बियाणे , खते , उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा . सर्व प्रकारचे आयात- निर्यात ई – कॉमर्स ( अत्यावश्यक सेवेतील वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासाठी ) मान्यताप्राप्त मिडिया . पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने पुरविणा – या सेवा

सर्व प्रकारच्या कार्गों / कुरियर सेवा डेटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिसेस / माहिती व तंत्रज्ञान यांचेशी संबंधित पायाभूत सुविधा आणि सेवा . शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा . विद्युत व गॅस वितरण सेवा . ATMs पोस्टल सेवा . बंदरे ( port ) व त्यासंबंधित उपक्रम कस्टम हाऊस एजंट , लस / औषधे । जीवन रक्षक औषधांची संबंधित वाहतूक करणारी अधिकृत परवाना धारक मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल , पॅकेजिंग साहित्याची निर्मिती करणा – या / पुरवठा करणा – या सेवा . पावसाळयाच्या हंगामाकरीता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणा – या सेवा . आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे घोषित अत्यावश्यक सेवा .

२ ) सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा ( Exemption Category ) 1210 . अ ) कार्यालये F पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खालील कार्यालये सुरु राहतील . केंद्र , राज्य , स्थानिक स्वराज्य संस्था यांची कार्यालये ( Including Statutory Authorities and organisations ) , को- ऑपरेटीव्ह बँका . सार्वजनिक क्षेत्रातील बँका , खाजगी बँका अत्यावश्यक सेवा पुरवठा करणा – या कंपन्यांची कार्यालये विमा / मेडीक्लेम कंपनी , औषध उत्पादन करणा – या आस्थापना व त्यासाठी लागणारे साधन सामग्री उत्पादक तसेच त्यांच्याशी संबंधित कार्यालये , , रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था ( Standalone Primary dealers , CCIL , NPCI , पेमेंट सिस्टीम ऑपरेटर आणि रिझर्व बँकेने नियमित केलेल्या बाजार पेठेतील कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागीसह घातक व मध्यस्थी , सर्व नॉन – बकिंग वित्तीय महामंडळे . सर्व मायक्रो फायनान्स संस्था , वकील.सी. ए . यांची कार्यालये , वित्तीय संस्थेशी संबंधित कार्यालये ,

३ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील .

४ ) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त ( Non – Essential Category ) इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील , शनिवार व रविवार पूर्णत : बंद राहतील .

५ ) मॉल , सिनेमागृह ( Single screen and multiplex ) नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील .

६ ) रेस्टॉरंट , बार , फूड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेने सुरु राहतील . दुपारी ४.०० नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त घरपोच सेवा ( Home Delivery ) रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरु राहतील . ( प्रत्यक्ष जाऊन पार्सल घेणे ( take away ) बंद राहील ) . सर्व रेस्टॉरंट , बार . फूड कोर्ट इ . यांना दर्शनी भागावर बाहेरील बाजूस एकूण आसनक्षमता आणि ५० % प्रमाणे परवानगी असलेली आसन क्षमता यांचा बोर्ड लावणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या सुचनांच स्टीकर्स लावणे बंधनकारक असेल

७ ) लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी , अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी , शासकीय कर्मचारी , विमानतळ सेवा ( Airport Services ) , बंदरे सेवा ( Port Services ) यांच्या कर्मचा – यांना प्रवास करणेस परवानगी राहील .

८ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ) , खुली मैदाने , चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस फक्त सकाळी ०५.०० ते सकाळी ० ९ .०० वाजेपर्यंत सुरु राहतील .

९ ) सूट देण्यात आलेल्या आस्थापना / सेवा ( Exemption Category ) व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ( Working Days ) ५० % कर्मचारी क्षमतेने दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील .

१० ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड १ ९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये ( Goverment offices and Emergency services required for Covid 19 management ) १०० % क्षमतेने सुरु राहतील . शासकीय कार्यालये ( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणा – या कार्यालयां व्यतिरिक्त ) ५० % अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील . उपरोक्त कार्यालये | आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आयुक्त . पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांची परवानगी घ्यावी .

११ ) सर्व आउटडोअर स्पोर्ट ( outdoor games ) सर्व दिवशी फक्त सकाळी ०५.०० ते ० ९ .०० या वेळेत सुरु राहतील . ( सायंकाळी बंद राहतील . )

१२ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात जेथे चित्रीकरणाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी चित्रीकरण ( Shooting ) करण्यास परवानगी राहील . चित्रिकरणा संबंधित कर्मचा – यांना जवळच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असल्यास ( Dedicated Colony ) तसेच त्या ठिकाणाहून स्वतंत्र वाहनाने ने आण करण्याची व्यवस्था असल्यास चित्रीकरण करण्यास परवानगी असेल . मात्र सायंकाळी ०५.०० नंतर चित्रीकरणाच्या ठिकाणाहून बाहेर प्रवास करता येणार नाही .

१३ ) सामाजिक , धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास ५० लोकांच्या उपस्थितीत फक्त सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत परवानगी राहील . , उपरोक्त कार्यक्रमाचा कालावधी हा ०३ तासापेक्षा जास्त असू नये . , सदर ठिकाणी खाद्यपदार्थाचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील . – सदर कार्यक्रमात Covid Appropriate Behaviour ( CAB ) चे पालन करावे . , आदेशाचे पालन न करणा – या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करावी . तसेच वारंवार नियमांचा भंग झाल्यास सदर आस्थापनाचे परवाना रद्द करणे अथवा मे . केंद्र शासन कोविड १ ९ आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील .

१४ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील . सदर ठिकाणी मंदिराच्या आवारात राहणा – या कर्मचा – यांमार्फत दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील .

१५ ) लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील . मे . शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सुचनांनुसार धार्मिक स्थळी विवाह संबंधित कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील .

१६ ) अंत्यसंस्कार , दशक्रिया विधी व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील .

१७ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ज्या बांधकामांच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे . असे बांधकाम सुरु ठेवता येतील . तथापि , बाहेरून येणारे कामगार असल्यास तसे बांधकाम दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवनगी राहील . मात्र बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी ०४.०० वाजता तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडतील .

१८ ) कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बी – बियाणे , खते , उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील

१९ ) ई – कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील .

२० ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास ( जमावबंदी ) प्रतिबंध राहील तसेच सायंकाळी ०५.०० नंतर कलम १४४ ( संचारबंदी ) लागू करण्यात येत आहे .

२१ ) व्यायामशाळा ( Gym ) , सलून , ब्युटी पार्लर , स्या , wellness centers आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार ( by appointment ) सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील . ( शनिवार व रविवार संपूर्णतः बंद राहतील ) मात्र सदर ठिकाणी वातानुकुलन ( A. C. ) सुविधा वापरता येणार नाही .

२२ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ( PMPML ) आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेने ( without standing ) सुरु राहतील , अत्यावश्यक सेवेशी निगडीत व्यक्तीनाच त्यातून प्रवास करता येईल .

२३ ) माल वाहतूक करणा – या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त ३ व्यक्ती ( चालक + क्लीनर / मदतनीस ) यांना इतर प्रवाश्यांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करणेस परवानगी राहील .

२४ ) खाजगी वाहनातून , बसेस तसेच लाब अंतराच्या रेल्वे मधून आंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील . मात्र सदर वाहनाने शासनाने घोषित केलेल्या लेवल ५ मधील ठिकाणी थांबणार असतील तर . pass असणे बंधनकारक राहील . अशावेळी वाहनामधून प्रवास करणा – या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र – pass आवश्यक राहील .

२५ ) निर्यातपुर्वक उद्योग / Export oriented units ( including MSMEs that need to fulfill export obligation ) मधील उत्पादन नियमितपणे सुरु राहील .

२६ ) खालील उत्पादन क्षेत्र / उद्योग नियमितपणे सुरु राहतील . अ ) अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग ( Essential goods manufacturing units ) – ( अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना लागणारा कच्चा माल उत्पादन करणरे युनिट , त्याची पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळी यासह ) . ब ) सतत प्रक्रिया करणारे उद्योग ( All continuous process industries ) – ( Unites that require process that are of such a nature that these cannot be stopped immediately and cannot restart without considerable time requirement ) क ) राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाशी संबधित उत्पादन करणारे उद्योग

२७ ) उपरोक्त मुद्दा क्र . २५ व २६ येथे नमूद केलेल्या उद्योगांव्यतिरिक्त इतर सर्व उत्पादन क्षेत्र हे ५० % कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील . कर्मचारी ने – आण करण्यासाठी संबधित उद्योगांनी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करावी . सदर कर्मचा – यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करता येणार नाही .

२८ ) उपरोक्त आदेशामध्ये परवानगी देण्यात आलेल्या ज्या आस्थापना दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी तसेच त्या ठिकाणावरुन सेवा घेणारे नागरिक यांनी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत त्यांचे घरी पोहचणे अपेक्षित आहे .

२९ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक , माध्यमिक शाळा , महाविद्यालये , शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत पुर्णत : बंद राहतील . सर्व प्रकारचे कोचिंग कासेस , प्रशिक्षण संस्था पूर्णत : बंद राहतील . मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील .

, मात्र कोविड १९ चे व्यवस्थापनाकरिता वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत Skill Development प्रशिक्षण कोर्सेस सुरु राहतील . त्यांनी Covid Appropriate Behaviour ( CAB ) चे पालन करावे . ३० ) मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील . शनिवार व रविवार फक्त घरपोच सुविधा ( Home Delivery ) सुरु राहील .

३१ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने , बाजार , कंपनी , फॅक्टरी , बांधकाम स्थळ ( Construction Site ) , हॉटेल , रेस्टॉरंट , बार , फूड कोर्ट इ . ठिकाणी काम करणा – या कामगार व इतर व्यक्तीची रॅपिड अँटिजेन चाचणी ( RAT ) प्रत्येक पंधरा दिवसांनी करणे बंधनकारक राहील . स्थानिक क्षेत्रिय अधिकारी यांनी त्यांचे क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी वैद्यकीय विभागाच्या मदतीने याची अंमलबजावणी करावी .

३२ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक , विक्रेते , व्यापारी , कामगार इत्यादी सर्व लोकांनी मास्क न वापरल्यास किंवा कोविड १ ९ प्रोटोकॉल विरोधी वर्तन केल्यास ( उदा . धुंकणे , योग्य अंतर न पाळणे इत्यादी ) त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रत्येकी १० भरारी पथके , २० कोविड मार्शल पथके यांच्यामार्फत कारवाई करण्यात यावी . कोविड १ ९ नियमांची कडक अंमलबजावणी करणेकामी क्षेत्रिय अधिकारी यांचे सुचनेनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी / कर्मचारी यांनी लग्न समारंभ , सामाजिक , धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम तसेच गर्दी करणारी ठिकाणे ( हॉटेल , रेस्टॉरंट , मंगल कार्यालय इ . ) या ठिकाणी कडक कारवाई करणेकामी सहभाग घ्यावा . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित भरारी पथकातील कोविड मार्शल / पोलीस यांना दंडात्मक कारवाई करणेकामी मी प्राधिकृत करीत आहे .

संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार / राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार , अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील . सदर आदेश दि . २८.०६.२०२१ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील असे आयुक्त राजेश पाटील यांनी कळविले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 day ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago