Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : मोठा निर्णय … राज्यातील या १८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन हटविला … बघा , कुठे काय सुरू होणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३जून) : महाविकास आघाडी सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन काही जिल्ह्यांमध्ये शिथील करण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी एक निकष लावण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट (बाधित होण्याचा दर) ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे तेथे लॉकडाऊन हटविण्यात आला आहे. तशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

▶️हा आहे निकष
ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे
ऑक्सिजनचे बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Google Ad

▶️हे सुरू होणार
मॉल्स, हॉटेल्स, दुकाने पुर्वीप्रमाणेच सुरू होतील
क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅक, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्णपणे सुरू होतील
चित्रपट गृहे, मल्टीप्लेक्स सुरू होतील
चित्रपट शुटींगला परवानगी
सार्वजनिक कार्यक्रम व लग्न सोहळ्यांना मान्यता
जमावबंदी राहणार नाही
जीम सुरू होणार
एसटीची सेवा १०० टक्के क्षमतेने

एकूण ४ टप्प्यात अनलॉक
पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के, ऑक्सिजन बेड्स २५ टक्क्यांपेक्षा कमी टक्के भरलेले)
दुसऱ्या टप्प्यात ५ जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के, ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्के भरलेले)
तिसऱ्या टप्प्यात १० जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट ५ ते १० टक्के, ऑक्सिजन बेड्स ४० टक्के भरलेले)
चौथ्या टप्प्यात २ जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट १० ते २० टक्के, ऑक्सिजन बेड्स ६० टक्के भरलेले)

▶️पहिल्या टप्प्यात हे जिल्हे
नाशिक, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!