Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

BIG BREAKING : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मे) : पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या चिंचवड येथील कार्यालयात त्यांच्यावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. सुदैवाने त्यात ते बचावले आहेत. घटनेचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. आरोपीने पिस्तूलातून गोळ्यांच्या तीन फैरी झाडल्याची माहिती समजली आहे. तानाजी पवार असे संशयिताचे नाव असून त्याला बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दरम्यान, संशयित तानाजी पवार आणि त्याच्यासोबत आणखी एक जण आज दुपारी आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात घुसले. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तुलामधून ३ राऊंड फायर केले. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांना घटनास्थळावरून २ पुंगळया, १० ते १२ राऊंड, पिस्टल, २ मॅगझीन मिळाल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Google Ad

दरम्यान भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेल नाही. घडलेल्या प्रकारचा सोक्षमोक्ष पोलीस लावतील, त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!