Categories: Editor Choiceindia

BIG BREAKING : फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचं कोरोना लसीकरण … फक्त या लोकांना मिळणार मोफत लस!

महाराष्ट्र 14 न्यूज : अखेर तो दिवस जवळ आलाच. सर्वसामान्यांची कोरोना लशीची प्रतीक्षा संपली. आता सर्वसामान्यांचंही लसीकरण होणार आहे. 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान यापैकी काही जणांना मोफत कोरोना लस दिली जाईल तर काही जणांकडून शुल्क आकारलं जाईल, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ज्यांना इतर आजार आहेत त्यांचं लसीकरण केलं जाणार आहे. सरकारी केंद्रं आणि खासगी रुग्णालयात हे लसीकरण केलं जाईल. यामध्ये 10 हजार सरकारी केंद्रांचा आणि 20 हजार खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. ज्यांना सरकारी केंद्रावर लस दिली जाईल, त्यांना मोफत लस मिळेल. तर ज्यांना खासगी रुग्णालयात लस दिली जाईल, त्यांच्याकडून शुल्क आकारला जाईल. कोरोना लशीसाठी किती पैसे घेतले जातील याबाबत आरोग्य विभाग दोन तीन दिवसांत घोषणा करेल, असंही जावडेकर यांनी सांगितलं.

देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झालं. सध्या आरोग्य कर्मचारी आणि त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाते आहे. 23 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 1.19 कोटी पेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. 23 फेब्रुवारीला दिवसभरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 1.61 लाख लोकांना लस देण्यात आली. त्यापैकी 63,458 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लशीचा दुसरा डोस घेतला. महाराष्ट्रात 9,29,848 जणांनी पहिला आणि 73,858 जणांनी दुसरा डोस अशा एकूण 10,03,706 लोकांनी लस घेतली.

Maharashtra14 News

Recent Posts

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

22 hours ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

2 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

2 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

6 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

7 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

1 week ago