Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरात युवासेनेला मोठा धक्का … नाराजांनी दिला राजीनामा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा युवा सेना युवाअधिकारी निलेश हाके व चिंचवड विधानसभा युवासेना अधिकारी माऊली जगताप यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटातील मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या चार वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात युवा सेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलन,मोर्चे करत शक्यतो मार्गाने युवासेनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला.

पिंपरी चिंचवड शहरात युवा सेना बळकट करण्यासाठी व पक्ष वाढीसाठी काम केले परंतु त्याची कोणतीही दखल वरिष्ठांकडून गेली नाही कार्यकर्त्यांना उभारी मिळावी या दृष्टिकोनातून मार्गदर्शनपर शहरात एकाही वरिष्ठ नेत्याची भेट होत नाही.

Google Ad

एकंदरीतच काय तर गेल्या पाच वर्षात म्हणावे तसे सहकार्य व पाठबळ मिळाले नाही यातून काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण होत चालले असून असे चालत राहिल्यास आम्हाला मोर्चे,आंदोलन व लोकहितासाठी काम करण्याची ईच्छा आहे ती थंड होईल व संधीपासून मुकावे लागेल त्यामुळे आम्ही शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला असे निलेश हाके यांनी सांगितले व मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारशैली व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिंदे गटात खा.श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला असल्याचे सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!