Google Ad
Editor Choice Technology

नरेंद्र मोदींचा जगात गाजावाजा , बायडन यांनाही मागे टाकलं , लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : जागतिक नेत्यांच्या मांदियाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत अन्य दिग्गज नेत्यांनाही मागे टाकून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. अमेरिकेतील ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या डेटा इंटेलिजन्स संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मोदी यांनी ६६ टक्के ग्लोबल अप्रूव्हल रेटिंग मिळवून यादीत आघाडी घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कोरोना काळातही कायम आहे आणि ते जगातील सर्वात स्वीकृत नेते ठरले आहेत. अमेरिकेतील डेटा इंटेलिजेंस फर्म ‘मॉर्निंग कंसल्ट’ द्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘Global Leader Approval ‘ म्हणून स्विकारलं आहे. मोदी जागतिक इतर नेत्यांपेक्षा पुढे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक पातळीवरील रेटिंग रेटिंग 66 टक्के आहे. आकडेवारीनुसार, कोरोना काळातही पंतप्रधान, अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनी या 13 देशांच्या इतर नेत्यांपेक्षा अव्वल ठरले आहेत.

Google Ad

मोदी यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी तर तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती लोपेझ ओब्रेडोर हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ६या यादीत सहाव्या स्थानावर आहेत तर इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ८ व्या स्थानावर आहेत.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन चौथ्या तर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल पाचव्या स्थानावर आहेत. ब्राझील, फ्रान्स आणि जपानच्या राष्ट्रप्रमुखांची लोकप्रियता ३५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!