Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड : सोशल मिडायावर स्टेटस द्वारे महिती घेवुन कोयता बाळगणऱ्यास … भोसरी पोलीसांकडुन अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ मे) : गुन्हेगारांचे सोशल मिडीया अकाउंटची पाहणी करीत असताना पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगारांनी पूर्व वैमनस्यातुन इन्स्टाग्राम स्टेटसच्या माध्यमातुन विरोधी गटातील गुन्हेगारांना शिवीगाळ व खुन्नस देणारे संदेश पाठविल्याचे दिसुन आले.

त्याबाबत अधिक चौकशी केली असता स्टेटस ठेवणाऱ्यांच्या इंन्स्टाग्राम ग्रुपमधील काही सदस्य रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही गटांची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता त्यांचे हातुन एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकाचे अधिकारी व अंमलदारांनी सदस्यांची तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान आरोपी नामे शफिक सुलतान शेख, वय २३ वर्षे, धंदा-वेल्डींगकाम, रा. गोडावुन चौक, भोसरी फिरस्ता मुळ पत्ता:- गाव चाकोर इंद्रानगर, ता. चाकोर, जि. लातुर यास काल दिनांक १८/०५/२०२३ रोजी रात्री ०९/०० वा. चे सुमारास मोहननगर भोसरी येथे ताब्यात घेतले.

Google Ad

त्याचे कब्जात एक धारदार लोखंडी कोयता मिळुन आल्याने त्याचे विरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान त्याचे गटातील सदस्यांचे सद्गुरूनगर भोसरी येथील गुन्हेगारांशी वाद झाल्याने त्या वादाचा बदला घेण्यासाठी त्याने सदरचा कोयता बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर आरोपीचे साथीदारांविरुध्द मोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन व पिंपरी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!