Google Ad
Uncategorized

गांजा बाळगुन गावठी हातभट्टीपासुन बनावट देशी दारू तयार करण्याऱ्यास भोसरी पोलीसांकडुन अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ जुलै) : भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला गाहिती मिळाली की एक इसगाने पांच बंगला एस.टी. रोड, दापोडी परिसरात गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणला आहे. सदर ठिकाणी भोसरी पोलीसांनी पाच बंगला, एस. टी. रोड, दापोडी, पुणे येथील पी.डब्ल्यु. डी. च्या स्टिल वार्डयेथे जावून खात्री केली त्यावेळी बातमीच्या वर्णनाचा एक इसम संशयीतरित्या थांबलेला दिसला. पोलीसांची चाहुल लागताच तो तेथील पडक्या रूममध्ये शिरला त्यावेळी पोलीसांनी त्याला चौडुबाजुनी घेरून तो लपुन बसलेल्या खोलीत जावुन तो आरोपी नामे ओमकार महादेव लिंगे, वय २५ वर्षे, रा. पाच बंगला, घर नं. ११, एस. टी. रोड, दापोडी, पुणे याला ताब्यात घेतले.

त्यावेळी त्याची व तो थांबलेल्या खोलीची झडती घेतली असता ९ किलो ६२२ ग्रॅम वजानाचा गांजा, २३६० देशी दारू टैंगो पंचच्या बाटल्या ९०० मोकळ्या बाटल्या, लेबले व बाटल्याची झाकणे, १४० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळुन आली. पोलीसानी सदर ठिकाणावरुन वरील प्रमाणे एकुण ३.५५,५४५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचेविरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व मादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यास दाखल गुन्ह्याचे तपास कामी अटक करून त्याचेकडे तपास केला असता तो गावठी हातभट्टीची दारू मोकळ्या बाटलीमध्ये भरून त्याला लेबल व सिल लावुन तो बनावट देशी दारू टंगो पंच

Google Ad

नावाने विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ – १ श्री. विवेक पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग श्री. सतीश कसबे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भास्कर जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक कल्याण घाडगे, पोलीस उप-निरीक्षक मुकेश मोहारे, तसेच सहा पोलीस फौजदार राकेश बोयणे, संजय चव्हाण, पोलीस अंमलदार सचिन गारडे, मच्छिंद्र बांबळे, राजेंद्र राठोड, नवनाथ पोटे, सागर जाधव, सचिन सातपुते, प्रभाकर खाडे, संतोष महाडीक, मार्तंड बांगर, स्वामी नरवडे, महिला अंमलदार प्रतिभा मुळे, सुषमा पाटील यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!