Categories: Editor Choice

भोसरी रुग्णालयातील परिचारिकांचा संप मागे … आमदार लांडगे यांनी हस्तक्षेप करीत परिचारिकांचे वेतन तात्काळ काढण्याचे दिले आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना संकटकाळात ‘कोरोना योद्धा’ म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या परिचारिकांनी भोसरी रुग्णालयातील परिचारिकांनी संप पुकारला. त्यामुळे ९० कोविड बाधित रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. प्रसंगावधान राखत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी रुग्णालयात धाव घेतली. संबंधित परिचारिका यांच्याशी चर्चा करुन फैसला करीत प्रश्न निकालात काढला. कमी पगार आणि तो देखील वेळेवर मिळत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयातील परिचारिका मंगळवारी (दि. 4) सकाळी संपावर गेल्या. त्यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली होती. दरम्यान, आमदार लांडगे यांनी रुग्णालयात धाव घेतली.

संबंधित परिचारिकांना एकत्र बोलावून चर्चा करण्यात आली. यावेळी महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के, डॉ. विनायक पाटील आदी उपस्थित होते. महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेडी म्हणाले की, या रुग्णालयातील परिचारिकांना तीन महिन्यांसाठी घेतले असून, त्यांना पगारही व्यवस्थित आहे. या महिन्याच्या पगाराचा धनादेश काढला आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टी आल्यामुळे तो बॅंकेतून त्यांच्या खात्यात जमा झालेला नव्हता. आज मंगळवारी सकाळी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

करोना बाधितांवर उपचार करण्याचे काम जोखमीचे आहे. त्यामुळे महापालिकेच्या परिचारिकांप्रमाणे आपल्याला पगार द्यावा. तसेच पगार वेळेवर मिळावा. वेतनवाढ केली पाहिजे. शिष्टमध्ये महापालिका परिचारिकांप्रमाणे सुविधा मिळाल्या पाहिजे, आदी मागण्या भोसरी रुग्णालयातील परिचारिकांनी केल्या आहेत.

शासनाकडून किंवा संबंधित कंत्राटदाराकडून परिचारिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची हमी आमदार लांडगे यांनी स्वत: घेतली. तसेच, पगारासाठी टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करावी. संबंधित परिचारिकांना वेतनवाढ देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि सहायक आरोग्य वैद्यकीय लक्ष्मण गोफने यांना केल्या आहेत. विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांनी हस्तक्षेप करीत परिचारिकांचे वेतन तात्काळ काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे परिचारिकांनीही समाधान व्यक्त केले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

6 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

13 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago