महाराष्ट्र 14 न्यूज, दि.धनेश्वर गोशाळा ट्रस्ट यांच्या वतीने चिंचवडगाव येथील धनेश्वर मंदिर याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ‘धनेश्वर गोशाळा आधुनिक गोठ्या’चे भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. ४ ऑक्टोबर) संपन्न झाला.
गोरक्षण आणि गोपूजेला नेहमी प्राधान्य देणाऱ्या लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून हा धनेश्वर गोशाळा आधुनिक गोठा उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही नुकतेच गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या आधुनिक गोठ्याचे भूमिपूजन करताना आम्हाला आत्यंतिक आनंद होत आहे.
याप्रसंगी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.मंदार महाराज देव, आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, ज्येष्ठ नेते श्री. हनुमंतभाऊ गावडे, श्री.महेशजी कुलकर्णी, माजी सत्तारूढ पक्षनेते श्री. नामदेव ढाके, माजी उपमहापौर श्री. सचिन चिंचवडे, माजी नगरसेविका श्रीमती अश्विनीताई चिंचवडे, माजी नगरसेवक श्री. भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक श्री. सुरेश भोईर, माजी नगरसेवक श्री. ऍड. मोरेश्वर शेडगे, श्री.संतोष निंबाळकर, श्री.शेखर चिंचवडे, श्री.नाना शिवले, राष्ट्रीय खेळाडू पै. विजय गावडे, श्री.गतीराम भोईर, श्री.हरिभाऊ चिंचवडे, श्री.योगेश चिंचवडे, श्री.गणेश गावडे, श्री.दत्तात्रय भोईर, श्री.अंबरनाथ चिंचवडे, श्री.कैलास साठे, श्री.दिलीप गावडे, श्री.अनिकेत दळवी, श्री.महेश बारसावडे, श्री.गणेश मिरजकर, श्री.आवेश चिंचवडे, श्री.श्रीधर वाल्हेकर, श्री.अनिल गावडे, श्री.किशोर निंबाळकर, श्री.कैलास गावडे, श्री.अनिल भोईर, श्री.राजू भोईर, श्री.हेमंत भोईर, श्री.हेमंत डांगे, श्री.सहदेव डांगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.