Google Ad
Editor Choice

माझ्या मनातील ‘भाऊ’ …वाचा, काळूराम घारे यांच्या हृदयातील आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.२५ एप्रिल) : भाऊ” चिंचवडचे भाजप (BJP) आमदार आणि पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराचे माजी अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे ‘भाऊ’ लक्ष्मण जगताप हे बाणेर येथील खासगी रुग्णालयात बारा दिवस झाले उपचार घेत आहेत. अशाच एका कार्यकर्त्याला भावलेले’ लक्ष्मणभाऊ जगताप’ … वाचा, त्याच्याच शब्दांतून …

“भाऊ”

‘भाऊ’ हा शब्द उलटा वाचला तर ‘ऊभा’ असा होतो,
जो माणूस प्रत्येक कार्यकर्त्याच्या सर्वच सुख दुःखात खंभिरपणे ऊभा राहून भक्कम आधार देतो, परिस्थितीशी लढण्यासाठी बळ देतो,आणि तोच आमचा आधारस्तंभ आज आजारपणाच्या चक्रव्यूवात अडकलेला पाहून आमचं काळीज फाटून जातंय,

Google Ad

भाऊ हे आजारपणाचं चक्रव्यूव तोडून तुम्हाला उठावंच लागेल!
भाऊ आजपर्यंत तुम्ही कार्यकर्त्यांना दिलेला प्रत्येक शब्द सचोटीने पाळत आले आहात त्यामुळे.
भाऊ आम्हा कार्यकर्त्यांना तुम्ही दिलेले वचन पाळण्यासाठी तुम्हाला उठावंच लागेल!

पिंपरी चिंचवडकरांना तुम्ही दाखविलेले भव्यदिव्य स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भाऊ तुम्हाला उठावंच लागेल!
सर्वच कार्यकर्ते आपापल्या धार्मिक स्थळी भाऊंच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात,पायी वारी करतात कार्यकर्त्यांच्या या प्रेमाखातर भाऊ तुम्हाला उठावंच लागेल!

भाऊ आज माझ्या घरातील चिमुकली मुले जी तुम्हाला आजपर्यंत कधी भेटलीसुद्धा नाही ती चिमुरडी मुले रोज डोळ्यात आसवं आणून तुमच्या तब्येतीची विचारणा करतात त्यांच्या भाबड्या प्रश्ननांची उत्तरे देताना आमच्या डोळ्यातील अश्रू लपवणे कठीण होतंय त्या चिमुरड्यांच्या निरागस आणि निर्भेळ प्रेमापोटी भाऊ तुम्हाला उठावंच लागेल.
कार्यकर्त्यांना स्फूर्ती आणि चेतना देण्यासाठी भाऊ तुम्हाला उठावंच लागेल”
“मावळ लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी भाऊ तुम्हाला उठावंच लागेल”

*भाऊ लवकर बरे व्हा आम्ही आतुरतेने तुमची वाट पाहत आहोत*

 

काळूराम लक्ष्मण घारे
डोणे मावळ

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!