Google Ad
Editor Choice Pune

Pune : गावठी रिव्हॉल्व्हर व कोयते बाळगणा – या अटक आरोपीकडुन घरफोडीचा गुन्हा उघड … भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी

महाराष्ट्र 14 न्यूज : भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हददीत कात्रज घाट परिसर , स्वामी नारायण परिसर , गुजरवाडी इ . आडबाजुचे भागात चोरी , जबरी चोरी , वाहनचालंकाची लुटालुट असे गुन्हे घडत असल्याने सदर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगन्नाथ कळसकर यांचे सुचनाप्रमाणे पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे व तपास पथकातील पोलीस स्टाफ हे पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संतोष भापकर , सचिन पवार व राहूल तांबे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली .

जांभळे पेट्रोल पंपाजवळ , नविन बोगदयाजवळ , जांभुळवाडी येथे दोन इसम लुटमारी करण्याचे इरादयाने काळया रंगाचे शाईन गाडीवर थांबले असुन त्यांचेकडे गावठी पिस्टल व हत्यारे आहेत अशी बातमी मिळाल्याने पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे यांनी त्यांचे स्टाफसह सदर ठिकाणी जावुन १ ) ओंकार ऊमेश सातपुते , वय २१ वर्षे , रा . स . नं .१३५ , यशोदीप सोसायटी , संघर्ष चाळ चौक , वारजे माळवाडी , पुणे २ ) प्रितम विठठल ठोंबरे , वय १ ९ वर्षे , रा . यशोदीप चौक , बालाजी रेसीडन्सी , स . नं . ११ , वारजे माळवाडी , पुणे यांना शाईन मोटार सायकलसह ताब्यात घेतले त्यांची अंगझडतीत घेतली असता ओंकार ऊमेश सातपुते याचे जवळ एक गावठी पिस्टल , एक जिवंत राऊंड व एक लांबडा धारदार कोयता मिळुन आला तसेच प्रितम विठठल ठोंबरे याचे जवळ एक लांबडा धारदार कोयता मिळुन आला .

Google Ad

नमुद आरोपी हे प्रानघातक हत्यारासह लुटमारीचे उददेशाने तेथे थांबलेले मिळुन आल्याने त्यांचेवर भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टन नंबर ३७ | २०२१ भारतीय हत्याराचा कायदा कलम ३ ( २५ ) , ४ ( २५ ) , महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केले . नमुद दोन्ही आरोपी यांना अटक करुन त्यांचेकडे इतर काही गुन्हे केले आहेत का ? याबाबत सखोल तपास केला असता त्यांनी त्यांचा आणखी एक साथीदार साहील आनंद मोरे वय १८ वर्ष रा रा . स न १३६ त्रिमुती सोसायटी , यशोदिप चौक वारजे माळवाडी , स्मिता पाटील शाळेजवळ पुणे याचे मदतीने दिनांक १६/०१/२०२१ रोजी पहाटेवेळी आंबेगाव बुद्रुक , धबाडी येथील श्री गणेश सुपर मार्ट व त्याचे जवळ असलेले सुप्रिया किराणा दुकान अशा दोन दुकानांचे शटर उचकटुन त्यात घर फोडी चोरी केल्याचे कबुल केले.

गुन्हयातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी २,१८,००० / – इतकी रक्कम त्यांचेकडुन जप्त केली आहे . सदरची कारवाई मा . श्री . सागर पाटील साो , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०२ , पुणे शहर , मा . सर्जेराव बाबर साो , सहाय्यक पोलीस आयुक्त , स्वारगटे विभाग , पुणे शहर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगन्नाथ कळसकर , श्री अर्जुन बोत्रे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , भारती विदयापीठ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकांचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक , नितीन शिंदे , तपास पथकांचे अंमलदार रविन्द्र भोसले , अण्णासाहेब माडीवाले , संतोष भापकर , सोमनाथ सुतार , निलेश खोमणे , गणेश सुतार , सर्फराज देशमुख , समिर बागसिराज , हर्षल शिंदे , अभिजीत जाधव , गणेश शेंडे , राहूल तांबे , व विक्रम सावंत यांनी कारवाई केलेली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

  • 858901 35352I havent checked in here for some time as I thought it was obtaining boring, but the last few posts are fantastic quality so I guess Ill add you back to my everyday bloglist. You deserve it my friend 486072

  • 696865 783290Its a shame you dont have a donate button! Id most definitely donate to this outstanding web website! I suppose in the meantime ill be happy with bookmarking and putting your Rss feed to my Google account. I look forward to fresh updates and will share this blog with my Facebook group: ) 996028

  • Thanks for another fantastic post. Where else could anybody get that type of information in such an ideal way of writing? I’ve a presentation next week, and I am on the look for such info.

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement