महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मे) : तळेगाव दाभाडे ( ता मावळ जि पुणे ) येथील जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. हल्या नंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. हल्लेखोरांनी अचानक हल्ला केल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर हललेखोर त्याच ठिकाणी काही वेळ थांबून होते.
आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी भर दुपारी गजबजाट असलेल्या परिसरात हल्ला केल्याने सगळ्यांची एकच धावपळ उडाली. घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आवारे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
किशोर आवारे यांना मानणारा तळेगावात मोठा वर्ग होता. सामाजिक कार्याची त्यांना पहिल्यापासूनच आवड होती. आपल्या सहकाऱ्यांसमवेत समाजकार्यात त्यांनी वाहून घेतले होते. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या वतीने डॉ.निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार आवारे यांना जाहीर झाला होता. कोरोना काळात तसेच कोल्हापूर आणि चिपळूणमधील महापुराच्या काळात त्यांनी स्वखर्चातून भरीव मदतकार्य केले होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…