Google Ad
Articles india

Delhi : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्याद्वारे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या रुपात वर्षपूर्ती … कार्यकर्त्यांना संबोधित करताना लिहिलं पत्र!

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या रुपात आपल्या सेवाकार्याचे प्रथम वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जे. पी. नड्डा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आपण सर्वांनी यशस्वी आणि कर्मयोगी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात आपल्या त्याग , परिश्रम आणि तपस्येच्या बळावर कोविड संक्रमणाच्या या आव्हानात्मक काळात पक्षाला गतिमान ठेवण्याचे कार्य केले . एक राजकीय पक्षाच्या रुपात निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करणं , सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित सरकार देण्याचे आमचे संकल्प आहेच .

मात्र एक राजकीय पक्ष कशाप्रकारे एक सेवेचा मार्ग बनू शकतो , याचे अप्रतिम उदाहरणदेखील तुम्ही समोर ठेवले आहे . मा . पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी 130 कोटी देशवासियांना कोविडविरुद्धच्या या निर्णायक लढ्यासाठी केवळ तयारच केले नाही तर त्यांच्यासाठी गरीब कल्याण योजना , आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाच्या माध्यमातून अत्यंत गरीब व्यक्तीचा विचार करत देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिशील ठेवले .

Google Ad

मागील वर्ष हा असा कालखंड आहे , ज्याचे यापूर्वी कोणतेही उदाहरण मिळत नाहीत . या कठीण काळात तुम्ही ज्याप्रकारे एकत्र येऊन मानवतेची सेवा केली आणि पक्षाला जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या सहजतेने आणि परिश्रमाने एकत्र येऊन कार्य केले , ते अद्वितीय होते . यासाठी मी तुम्हा सर्वांचे सहृदयाने आभार व्यक्त करतो, असे या पत्रात नड्डा यांनी म्हटले आहे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

33 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!