Google Ad
Editor Choice

शहरातील हॉकी खेळाडूंना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण – बी.जी. शिर्के कंपनीकडून महापालिकेला २० लाखांचे अर्थ सहाय्य जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज,( १० मे २०२२) : पिंपरी चिंचवड शहरातील हॉकी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण मिळण्यासाठी बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि. ने प्रायोजकत्व स्विकारले आहे. त्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सीएसआर उपक्रमांतर्गत 20.40 लाख रुपयांची आर्थिक मदत महापालिकेला देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत सोमवारी, दि. ९ रोजी शिर्के कंपनीचे सीनियर जनरल मॅनेजर एन.एम. कदम यांनी मा. आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे पत्र सुपूर्त केले. यावेळी स्मार्ट सिटीचे जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) अशोक भालकर उपस्थित होते.

औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला भारताचे स्पोर्ट्स हब बनविण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिकेने हॉकी खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीअम उभारले आहे. याठिकाणी शहरातील हॉकी खेळाडूंना स्थानिक स्तरावर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांद्वारे उत्तम प्रशिक्षण मिळावे, यासाठी दोन ज्युनिअर प्रशिक्षक व दोन सहाय्यक प्रशिक्षकांचा मानधनाचा खर्च उचलणार असून यासाठी महापालिकेला अर्थ सहाय्य देणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Google Ad

राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीसह विविध आंतरराष्ट्रीय खेळांना प्राधान्य् देण्यासाठी पायाभुत सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. शिर्के कंपनीकडून मिळणारे अर्थ सहाय्य हॉकीमधील आगामी तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शहरात राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी महापालिकेकडून अनेक योजना आखल्या जात आहे. शहरातून ऋतुराज गायकवाड, नेमबाज अंजली भागवत, हॉकीपटू धनराज पिल्ले यांसारखे आंतराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!