पिंपरी चिंचवड शहरातील लाभार्थी होणार ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार!
-भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा नियोजनात पुढाकार
-ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातील 3 हजार नागरिकांची उपस्थिती
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो टप्पा दोन, ‘वेस्ट टू एनर्जी’, आणि आवास योजनेच्या लोकार्पण व भूमिपूजन
महाराष्ट्र 14 न्यूज, )दि.३१ जुलै) : राज्यातील पहिला ‘वेस्ट टू एनर्जी’ म्हणजेच कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प , सर्वांसाठी घर या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १७ हजार घरांची निर्मिती होत आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातून 3 हजार नागरिक तसेच लाभार्थी हजेरी लावणार आहेत. अशी माहिती भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे उभारण्यात आलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन आणि डूडूळगाव व सेक्टर- १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच, बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरातून खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिकनगरी आहे. उद्योगधंद्यांच्यानिमित्ताने या शहरात राज्याच्या विविध भागातून नागरिक कामानिमित्ताने स्थायिक झाले. या कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजप सरकारने महापालिकांना पाठबळ दिले.प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना राबवली. बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १२८८ सदनिका उभारण्यात आल्या आहेत. यांचे लोकार्पण व डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने ११९० सदनिका उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यापैकी बोऱ्हाडेवाडीतील १२८८ घरांचा चावी वाटप कार्यक्रम आणि डुडूळगाव व प्राधिकरण सेक्टर-१२ मधील प्रकल्पाचा भूमिपुजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पिंपरी चिंचवड शहरातील कचरा मोशी कचरा डेपो मध्ये टाकण्यात येत आहे. साधारण 1991 मध्ये कचरा डेपोची अधिकृत घोषणा करण्यात आली मात्र यानंतर कचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाय योजना न झाल्यामुळे सध्या या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत यामुळे दुर्गंधीचा सामना येथील नागरिकांना करावा लागतो. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे एकीकडे वीज निर्मिती होणार आहे याशिवाय कचऱ्याचे डोंगर हटविण्यास देखील मदत होणार आहे. हा एक प्रकारे संपूर्ण शहरवासीयांनाच दिलासा असून यापुढेही नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊनच चांगले उपक्रम राबवले जाणार आहेत असे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले.
शहरात मेट्रो सुसाट: पुणे ते पिंपरी अंतर होणार अवघ्या 22 मिनिटांमध्ये पार :-
पुणे मेट्रो टप्पा १ च्या काम पूर्ण झालेल्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी दुपारपासून पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्ट आणि डेक्कन जिमखाना ते रुबी हॉल या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर मेट्रोसेवा सुरु होणार आहे. मेट्रोमुळे पुणे रेल्वे स्थानक येथून पिंपरी येथे येण्यासाठी अवघे 22 मिनिट लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट (6.91 किलोमीटर), गरवारे महाविद्यालय ते सिव्हील कोर्ट (2.38 किलोमीटर), सिव्हील कोर्ट ते रुबी हॉल (2.37 किलोमीटर) या तीन मार्गांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश असणार आहे. या सर्व मार्गांसाठी सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन हे इंटरचेंज असणार आहे. यामुळे वनाज ते पिंपरी-चिंचवड आणि रुबी हॉस्पिटल ते पिंपरी-चिंचवड तसेच वनाज या मार्गावर मेट्रोने प्रवास करता येणार आहे. लोकार्पण झाल्यानंतर सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रो सुरु झाल्यानंतर पुणे ते पिंपरी हे अंतर अवघ्या 22 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. सध्या पुणे मेट्रोच्या सेवेत 18 मेट्रो रेल्वे दाखल झाल्या आहेत.
एकीकडे शहरातील आपल्याच बांधवांना हक्काचा निवारा देत असताना दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन “वेस्ट टू एनर्जी”सारखा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. ही गोष्ट शहराच्या विकासाच्या मापदंडाला वेगळी उंची देणारी आहे. शहर नियोजनाची पुढील पन्नास वर्षे लक्षात घेता नागरिकांना हक्काचे घर, त्यांचे आरोग्य आणि मेट्रोसारखा उपक्रम शहरात सुरू होत आहे यातून सार्वजनिक वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. शहर नियोजनाच्या दृष्टीने या गोष्टी अत्यंत उपयुक्त असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामध्ये आपल्या शहराला या गोष्टींचा लाभ मिळत असून ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.
*पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा :- वेळ ठिकाण*
*▶️१०.१५ :- पुणे विमानतळ, महाराष्ट्र*
*▶️१०.४० :- अॅग्रिकल्चर ग्राउंड हेलिपॅड, पुणे आगमन*
*▶️१०.५५ :- श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर आगमन*
*▶️11.00 ते 11.30*
*दगडू शेठ मंदिरात दर्शन व पूजा*
*▶️11.40 :-*
*एसपी कॉलेज ग्राउंडवर आगमन*
*▶️11.45 ते 12.30 :-*
*एसपी कॉलेज ग्राउंड, कार्यक्रमाचे ठिकाण लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा*
*▶️12.40*
*पोलीस मुख्यालय, शिवाजी नगर कार्यक्रमाचे ठिकाण*
*▶️12.45 ते 01.45*
*मेट्रो गाड्यांना ध्वज दाखवने ;*
*विविध कामांचा पायाभरणी/उद्घाटन* *(पुणे / पिंपरी चिंचवड येथील प्रकल्प)*
*▶️दुपारी 01.45 ते 02.15*
*राखीव*
*▶️2.25*
*अॅग्रिकल्चर ग्राउंड हेलिपॅड, पुणे*
*▶️02.50*
*पुणे विमानतळ*
*02.55*
*उप पुणे विमानतळ, महाराष्ट्र प्रयाण*
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…