Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

१८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना मिळणार या ४७ केंद्रांवर लस … असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे २६ जून चे कोविड-१९ लसीकरण!

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .२५ जून २०२१) : उद्या दि .२६ / ०६ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ चा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

तसेच उद्या दि .२६ / ०६ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

▶️ सर्व वयोगटामधील लाभार्थी यांनी कोविन अॅप वर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या १० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा – या ९ ० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .

▶️ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दर गुरुवारी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी .

तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी आज रात्री ८.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि .२६ / ०६ / २०२१ रोजी सकाळी ८.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये .

तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा , व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले 1-20 किंवा DS – 160 From ( Admission confirmation letter and I – 20 or DS – 160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc. ) , मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा – या नागरीकांना ऑफर पत्र तसेच टोकिओ ऑलंपिकमध्ये भाग घेण्यासाठी नामांकन याबाबतचे पत्र असलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार दि . २६ जून २०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी -१० ते सायं- ०५ या वेळेत करण्यात येणार आहे .

लसीकरण केंद्राचे नाव :-
नविन जिजामाता रुग्णालय
वयोगट :- वय वर्षे १८ व त्यापुढील क्षमता :- १ ला डोस -१०० दुसरा डोस -१००

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!