Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

१८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण सुरू … असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे कोविड-१९ लसीकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२३ जून २०२१) : उद्या दि .२४ जून २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ चा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

सदर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील कोविन अॅप वर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या ५० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा – या ५० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .

तसेच उद्या दि .२४ / ०६ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या दि .२४ / ०६ / २०२१ रोजी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी .

तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी आज रात्री ८.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि .२४ / ०६ / २०२१ रोजी सकाळी ९ .०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये .

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!