Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपा कडून १२ मे रोजी फक्त ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना मिळणार लसीचा दुसरा डोस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आज रोजी ०८ लसीकरण केंद्रे- नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, डोळ्यांचे हॉस्पिटल –मासुळकर कॉलनी, पिंपळे ‍निलख पी.सी.एम.सी स्कुल, नवीन आकुर्डी रुग्णालय व आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी या लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी १६०० नोंदणी केलेल्या नागरीक/लाभार्थ्यांपैकी १५६० लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.

तसेच आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शासनाकडून फक्त ‘ कोविशिल्ड ’ लस १५५०० डोस प्राप्त झालेले आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या दि.१२/०५/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही.

Google Ad

फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थींना ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस देण्याची कार्यवाही सकाळी १०.०० ते ५.०० या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे. तरी वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये अशा प्रकारे महापालिकेला सहकार्य करावे. असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!