Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

१५ मे पासून फक्त या ठिकाणी मिळणार ४५ वर्ष पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला व दुसरा डोस … पण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४/०५/२०२) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका लसीकरण केंद्रावर आज १८८५ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या दि.१५/०५/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना १५ मे २०२१ पासून ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ ते ११२ दिवस) देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उद्या दि.१५/०५/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘ कोविशिल्ड चा ’ पहिला व दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

Google Ad

असे आहे लसीकरण केंद्राचे नाव वयोगट पहिला डोस लाभार्थी क्षमता दुसरा डोस लाभार्थी क्षमता
(पहिला डोस घेतल्यानंतर ८४ ते ११२ दिवस झालेले लाभार्थी फक्त)

१ यमुनानगर रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील

पहिला १०० + दुसरा १००

२ तालेरा रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील

पहिला १०० + दुसरा १००

३ सावित्रीबाई फुले शाळा भोसरी वय वर्षे ४५ पुढील

पहिला १०० + दुसरा १००

४ नवीन जिजामाता रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील

पहिला१०० + दुसरा १००

५ आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ वय वर्षे ४५ पुढील

पहिला १०० + दुसरा १००

६ खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव वय वर्षे ४५ पुढील

पहिला १०० + दुसरा १००

७ नवीन आकुर्डी रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील

पहिला १०० + दुसरा १००

८ आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ वय वर्षे ४५ पुढील

पहिला १०० + दुसरा १००

तरी वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे असे कळविण्यात आले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!