Google Ad
Editor Choice

पिंपळे सौदागर येथील या भागाची अतिदुर्गम भाग म्हणजे काटे वस्ती, कुंजीर वस्ती, शेलार वस्ती अशी ओळख निर्माण होण्यास वेळ लागणार नाही…..?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ सप्टेंबर) : पिंपळे सौदागर हे पिंपरी चिंचवड शहरातील अतिशय वेगाने प्रगती करणारे गाव म्हणून नावलौकिक मिळविला आहे. गावालगत असणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कमुळे रस्ते, वाहतूक व्यवस्था,पाणी, सर्व कसे सोईसुविधा युक्त आहे, कारण ही तसेच आहे महानगरपालिकेला महसूल ही जादा प्रमाणात व वेळेवर मिळतो.

परंतु पिंपळे सौदागर गावठाण व अतिदुर्लक्षीत भाग म्हणून ओळखले जाणारे कुंजीर वस्ती, काटे वस्ती व शेलार वस्ती आज त्या ठिकाणी रस्त्यावर राडारोडा पडलेला असतो, लहान लहान गल्लीत रस्त्यांचा अभाव, चाळ पद्धत असल्याने पेव्हींग ब्लॉग च्या कामाचा दर्जा खालावलेला आहे.साडंपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होत नाही.

Google Ad

फक्त मतदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे परंतु. दैनंदिन गरजा पूर्ण होत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी प्रशासनाला दाखवुन देण्यांचे काम सातत्याने करत येत आहेत. काटे वस्ती या ठिकाणी सांड पाणी व ड्रेनेज चे काम होऊनही गेले पंदरा दिवस उलटून गेले तरी ही प्रशासनाला जाग येत नाही.

स्थानिक नागरिक परेशान झाले आहेत. तरी सदर बाब प्रशासनाने लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव करत आहे. जर येत्या आठवड्यात प्रशासनाला जाग आली नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केली आहे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!