Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : मोठी बातमी … बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट … या गोष्टींवर झाली चर्चा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७जून) : विधीमंडळाचे पक्षनेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यो दोन्ही नेत्यांमध्ये शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक येथे चर्चा झाली. भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन वर्ष लोटलं तरी महामंडळ प्राधिकरण आणि समित्यांचं वाटप प्रलंबित आहे. त्यामुळे आता येत्या पंधरा दिवसांत महामंडळांचं वाटप होईल, तसेच त्यासंदर्भातील चित्रही स्पष्ट होईल, अशी माहिती मिळत आहे. तिनही पक्षांमध्ये महामंडळांचं समसमान वाटप होत असल्यानं त्यातही चुरस दिसून येत आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. तसेच या भेटीनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

Google Ad

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. तेव्हापासून राज्यातील अनेक नेते शरद पवारांच्या भेटीला येत आहेत. यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीला गेले होते. शरद पवारांसोबतच्या या भेटींमुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्याचं दिसून आलं होतं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

20 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!