Google Ad
Editor Choice Education

पिंपरी चिंचवड शहरातील गणेश नगर खिवंसरा पाटील क्रांतिकारक चाफेकर शाळेतील विद्यार्थ्यांच्या व मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरात (आज १५ऑगस्ट) स्वतंत्र दिनानिमित्त प्र.क्रमांक २४ गणेश नगर मधील खिंवसरा पाटील क्रांतिकारक चापेकर शाळेतील विद्यार्थी व आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ” समजो और जानो शहर सुंदर बनाना पहचानो..या शिर्षका खाली शाळेमध्ये प्लास्टिक बंदी बाबत नुक्कड नाटक सादर करून गणेश नगर डांगेचौक बाजारपेठ, राहटणी चौक, कुणाल हाॅटेल राहटणी, थेरगांव पाण्याची टाकी या भागामध्ये रॅली काढण्यात आली.

यावेळी नागरिकांना प्लास्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्लास्टिक वापर टाळण्याबाबत सुचना व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत ग क्षेत्रीय कार्यालयचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट, सहायक आरोग्य आधिकारी राजु बेद, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे,आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल, शेखर निंबाळकर,अतुल सोनवणे, सतिश इंगेवाड, हेडमुकादम संतोष ओव्हळ, मुख्याध्यापक नटराज जगताप सर व शिक्षक शिक्षिका वर्ग व तसेच आरोग्य कर्मचारी अभय दारोळे, अरुण राऊत, प्रशांत पवार, राजु जगताप,अनिल डोंगरे, सूर्यकांत चाबुकस्वार व ठेकेदार कामगार यांनी सहभाग घेतला.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!