Google Ad
Editor Choice

२ ऑगस्ट २०२१ भारत सरकारची प्री पेड ई -व्हाऊचर सेवा सुरू … कोविड – १९ लस CSR चा फंड वापरू गरजू लोकांपर्यंत पोहचवता येणार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि . १८ ऑगस्ट २०२१) : २ ऑगस्ट २०२१ भारत सरकारने प्री पेड ई -व्हाऊचर सेवा सुरू केली आहे. या उपक्रमामुळे आता खाजगी कंपनींना कोविड – १९ लस CSR चा फंड वापरून e-voucher खरेदी करून गरजू लोकांपर्यंत पोहचवता येईल.

हा उपक्रमाची अमलबजावणी बँक व खाजगी कोविड – १९ लसीकरण केंद्र यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यां दानशूर व्यक्ती वा संस्था सरकारने निर्धारित केलेल्या SBI, Bank of Baroda, ICICI, HDFC,  अशा  एकून ९ बॅंकांकडून असे इ-व्हाऊचरस खरेदी करून गरजू लोकांपर्यंत ते पोहचवू शकतात. हे इ-व्हाऊचर QR code किंवा SMS द्वारे पोहोचविता येऊ शकेल. e-voucher संबंधित लाभार्थी व्यक्ती पोहचल्या नंतर COVID-१९ लस साठी आपले नाव नोंदवून ती व्यक्ती लस घेण्यासाठी खाजगी कोविड – १९ लसीकरण केंद्राकडे जाऊ शकते. तिथे या व्हाऊचर ची पडताळणी झाल्यास लगेचच त्या व्यक्तीला लगेचच लसीकरण देण्यात येईल.

Google Ad

या उपक्रमामुळे CSR तसेच इतर दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून अतिशय वेगवान पध्दतीने लसीकरण वाढवता येऊ शकेल.  पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या परिसरात खाजगी व सरकारी लसीकरण केंद्राच्या माध्यमातून दि. १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत लसीकरणा पात्र असणाऱ्या १८ लाख लोकांपैकी साधारण पहिली लस  घेणाऱ्यांची संख्या ८.९५ लाख इतकी होती तर दोन्ही लसीरण घेतलेल्यां ची संख्या साधारण ३. १६ लाख इतकी होती याचाच अर्थ साधारण ९ लाख लोकांनी ( म्हणजे ५०%) लोकांनी एकही लस घेतली नाही.

ही संख्या मोठी असून अशा उपक्रमाद्वारे वेळेत आपले लक्ष प्राप्त करण्यासाठी खाजगी व सरकारी क्षेत्रातील लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. खाजगी क्षेत्रातील कंपनीनीं  CSR माध्यमातून या कामासाठी आपली जबाबदारी उचलल्यास आपण आपले सामूहिक ध्येय लवकर साध्य करू शकू तरी या संपूर्ण उपक्रमाची माहिती प्राप्त होणे करीता संबंधित दानशूर व्यक्तींनी वा संस्थांनी महानगर पालिकेच्या CSR कक्ष येथे संपर्क साधावा , सदरहू कक्ष निळकंठ पोमण  यांच्या नियंत्रणा खाली चालू असून . या उपक्रमात सहभागी होणे करिता

▶️संपर्क :- विजय वावरे
( मोब . ७०५७७६६२२२ )
व श्रुतिका मुंगी
यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करणेत येत आहे.
–  CSR कक्ष  PCMC

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!