Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव मधील आर्य पाचंगे ने वडिलांच्या विरहाचे दुःख विसरून अनाथांच्या चेहऱ्यावर फुलवले हासू!

महाराष्ट्र 14 न्यूज : १४ मे‌ हा आपल्या आई वडिलांनाच्या लग्नाचा वाढदिवस या दिवशी घरात किंवा हॉटेलमध्ये काहीतरी गोड जेवण जेऊन आनंद सजरा करायचा … पण आर्य या वर्षी तो आनंद घेऊ शकत न्हवता, कारण थोड्याच दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे हा आनंद यावेळी आपण दुसऱ्यांना देऊ या असे त्याला वाटू लागले, ही गोष्ट पिंपळे गुरव येथील आर्य पाचंगे याने आपल्या आईला आणि मित्रांना बोलून दाखवली. या दिवशीच अक्षयतृतीया असल्याने आपण आपल्या भागातील अनाथांना अन्नदान करू अशी या किशोर वयीन मुलांच्या मनात कल्पना आली.

ऐकीकडे वडिलांचे छत्र हरपले.पण आपण हिमतीनं व घरी काहि न करता आजच्या करोना काळात आपण हि समाज्याचे काही देणे लागतो व आपण तर काहि खातो मग यां लहानग्यांना फुलं ना फुलाची पाकळी समजुन अन्न व‌ आब्यांचा आस्वाद घेता येईल असे आर्य पाचंगे याने ठरविले. पुलाव भात, आंबे व जिलेबीने दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना समवेत आपल्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे त्या गरीब मुलांच्या बरोबर आर्यच्या चेहर-यावरचा आनंद झाकत न्हवता.

Google Ad

यावेळी त्यांच्यासमवेत त्या च्या मित्रांनी सोमनाथ तडाखे, विठ्ठल लोखंडे , प्रतिक तडाके यांनी पण मोलाचे सहकार्य केले व जीवनात अनेक जणांनी असे करावे असे आवाहन आर्य ने केले. आर्य हा नेहमीच रोडवरील भिक मागणाऱ्या गरीब मुलांना आपल्याला जमेल तशी मदत म्हणजे नाष्टा देणे, चहा देणे अशी कार्य करत असतो.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!