Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दापोडी-फुगेवाडी, कासारवाडी परिसरातील नागरिकांसाठी लवकरच “ड्राईव्ह इन लसीकरण” सुरु करणार ..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२जून) : मुंबईच्या धर्तीवर दापोडी येथील गणेशनगर भागातील माता शितळादेवी मंदिारलगत आपल्या खाजगी मोकळ्या जागेमध्ये “ ड्रायव्ह इन लसीकरण केंद्र ” ( कोविड -१९ लसीकरण ) सुरू करण्यात यावे . अशी मागणी स्वीकृत नगरसेवक अनिकेत काटे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली होती.

लसीकरण केंद्रांवरील नागरिकांची गर्दी कमी होवून गाडीमध्ये बसून ज्येष्ठ नागरिक आणि शाररीक व्यंग्य असलेल्या व्यक्तींना प्रतिबंध लस घेता येणार आहे . तरी आपणामार्फत बरीक गोष्टींचा गांभीर्याने विचार करून दापोडी येथील माता शितळादेवी मंदिरालगत माझ्या खाजगी मोकळया जागेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत “ ड्रायव्ह इन लसीकरण केंद्र ” सुरू करण्यात यावे अशी मागणी स्वीकृत नगरसेवक अनिकेत काटे यांनी केली होती.

Google Ad

या गोष्टीची दखल घेत दापोडी-फुगेवाडी, कासारवाडी परिसरातील नागरिकांसाठी लवकरच “ड्राईव्ह इन लसीकरण” सुरु करणार असल्याने त्याकरिता माता शितळादेवी मंदिरालगत जागेची पाहणी करण्यात आली. स्वीकृत नगरसेवक अनिकेत राजेंद्र काटे, व त्यांचे जेष्ठ बंधू चिराग विजय काटे यांचे समवेत वैद्यकीय विभागातील डॉ. विजया आंबेडकर, डॉ. हांडे सहकारी कम॔चारी वर्ग यांनी जागेची पाहणी केली. हे लसीकरण केंद्र सुरू झाले तर परिसरातील नागरिकांना जवळच कोविड-१९ लसीकरणाची सोय उपलब्ध होईल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

68 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!