Google Ad
Editor Choice Maharashtra Sports

‘विवेक मालशे’ यांची भारतीय डेफ क्रिकेट असोसिएशन मध्ये सह सचिव या पदावर नियुक्ती … पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघाच्या वतीने कौतुकाची थाप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ६ जुलै २०२१) : पिंपरी चिंचवड शहराने अनेक जिल्हा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविले असून त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे शहराच्या नाववलौकिकात भर पडली यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारीही अग्रभागी आहेत. आपल्याला दिलेल्या कामाची जबाबदारी पार पाडत पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील अधिकारी ‘विवेक मालशे’ यांची भारतीय डेफ क्रिकेट असोसिएशन मध्ये सह सचिव या पदावर नियुक्ती झाली आहे.

त्यांच्या या नियुक्ती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघ यांच्या वतिने त्यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य कार्यालय पिंपरी येथे सत्कार करण्यात आला, कार्यक्रमामध्ये संघातील आजी, माजी खेळाडू व इतर कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थित होते,विवेक मालशे यांनी सन २००५ मध्ये लखनऊ येथे झालेल्या विश्वचषक क्रिकेट (डेफ) स्पर्धा मध्ये भारतीय क्रिकेट संघाला विश्वकरंडक जिंकून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती,त्या वेळेस ते संघाचे कर्णधार देखील होते..

Google Ad

आज दि.०७ जुलै रोजी शहरातील विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा गुणगौरव तसेच प्रशिक्षकांचा ऑनलाईन सत्कार समारंभ आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला यात विवेक मालशे, भांडारपाल पि.सी.एम.सी यांचाही सत्कार करण्यात आला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!