Categories: Uncategorized

मतदारांना आवाहन – मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल आणण्यास मनाई

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा, यासाठी मतदानाला जाताना कोणालाही जवळ मोबाईल बाळगता येणार नाही. मोबाईल स्वत:जवळ ठेवून मतदान केले आणि त्यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला किंवा मोबाईलच्या स्टेट्‌सवर ठेवल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक सोडून उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदार केंद्रावर  मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५६४ मतदान केंद्रे असून मतदारसंघात ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार आहेत. यामध्ये ३ लाख ४८ हजार ४५० पुरुष, ३ लाख १५ हजार ११५ महिला, तर ५७ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर छायाचित्रीकरण करण्यास बंदी असून मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्टवॉच,  वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई आहे.

मतदानाच्या दिवशी अनावधानाने एखाद्या मतदाराने मोबाईल मतदान करण्यासाठी सोबत आणल्यास मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. तसेच सर्व उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी करमाळ्यातील एका मतदान केंद्रावर मतदान करताना एका व्यक्तीने ‘ईव्हीएम’वर हातोडा मारला होता. माढ्यातील एका मतदाराने कांद्याने ‘ईव्हीएम’चे बटन दाबले आणि तो व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला होता. तर सांगोल्यातील एका मतदाराने पेट्रोल टाकून ‘ईव्हीएम’च जाळण्याचा प्रयत्न केला होता. हा अनुभव लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत असे अनुचित प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे. मतदारांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही आणि मोबाईल घेऊन गेलाच तर त्यांना मतदान करतानाचा व्हिडिओ काढता येणार नाही. तसा प्रकार आढळल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांमार्फत कठोर कारवाई केली जाणार आहे.

…’त्या’ व्यक्तीला अजूनपर्यंत नाही जामीन

लोकसभा निवडणुकीवेळी सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावर एका मतदाराने पेट्रोल टाकून ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावरील मशिन बदलून मतदान घ्यावे लागले होते. त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्याला अजूनपर्यंत न्यायालयातून जामीन मिळालेला नाही. त्यामुळे कोणीही असे कृत्य करू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वांना केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

6 days ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

2 weeks ago

जीवनात प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून भंडारा डोंगर येथील मंदिर उभारणीसाठी एक कोटींची देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ :  जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…

3 weeks ago

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…

4 weeks ago