Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे मा.आयुक्त श्री.शेखर सिंह यांचे आवाहन…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ८ सप्टेंबर २०२३ : सततच्या पर्जन्यवाढीमुळे पवना धरण क्षेत्रात पडणारा पाऊस तसेच पवना धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीतील पाणी पातळीची संभाव्य वाढ लक्षात घेता अशा परिस्थितीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

पवना, आंद्रा तसेच वडीवळे धरण क्षेत्र आणि धरणाच्या पुढील भागात होणारे पर्जन्यमान लक्षात घेता, पवना व इंद्रायणी नदीपात्रात आज सायंकाळपर्यंत अजून पाणी पातळीत वाढ होऊ शकते. याबाबत सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पवना धरण १०० टक्के भरल्याने सकाळी धरणाच्या वीज निर्मिती गृहाद्वारे आणि धरणाच्या सांडव्यावरून एकूण ५ हजार ६०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात आला असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना पवना धरणाच्या प्रमुखांकडून प्राप्त झाल्या असून धरणाच्या विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल होऊ शकतो, त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसात रस्त्यावरील विजवाहक तारा, विजेचे खांब, डी. पी. बॉक्स, फीडर बॉक्स, इत्यादी विदयुत वाहक ठिकाणांच्या संपर्कात येऊ नये तसेच अशा ठिकाणी जनावरे सोडू नये किंवा बांधू नये. औदयोगिक क्षेत्रात उघडयावर रासायनिक पदार्थांचा साठा करु नये. अशा ठिकाणी पाण्याचा संपर्क आल्यास दुर्घटना संभवू शकतात त्यामुळे त्यापासून नागरिकांनी जपून रहावे, असे आवाहन सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आहे.

महत्वाचे दूरध्वनी क्रमांक
मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष- ०२०- २८३३११११ / ६७३३११११

अग्निशमन केंद्रांचे संपर्क क्रमांक
क्र. अग्निशमन केंद्राचे नांव पत्ता दुरध्वनी क्रमांक
१ जन.अरुणकुमार वैद्य मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी संत तुकराम नगर,
पिंपरी -१८. २७४२३३३३
२७४२२४०५
९९२२५०१४७५
२ उप अग्निशमन केंद्र, भोसरी लांडेवाडी भोसरी ८६६९६९२१०१
९९२२५०१४७६
३ उप अग्निशमन केंद्र, प्राधिकरण सें.क्र २३ प्राधिकरण,
निगडी – ४४ २७६५२०६६
९९२२५०१४७७
४ उप अग्निशमन केंद्र, रहाटणी सं.न. १, औंधरोड, रहाटणी,
पुणे – १७. ८६६९६९३१०१
९९२२५०१४७८
५ उप अग्निशमन केंद्र, तळवडे आयटी पार्क जवळ, लक्ष्मी नगर, तळवडे २७६९०१०१
९५५२५२३१०१
६ उप अग्निशमन केंद्र,
चिखली जाधववाडी. चिखली २७४९४८४९
८६६९६९४१०१

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी… कोण होणार, चिंचवडचा आमदार ?

  महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…

2 days ago

मतदारांना आवाहन – मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल आणण्यास मनाई

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…

6 days ago

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन …. अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…

1 week ago

गावच्या स्मार्ट विकासासाठी शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर चिंचवडवासीयांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…

1 week ago

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात-निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…

1 week ago