महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का दिला आहे. एकाच विभागामध्ये वर्षानुवर्षे काम करणारे अधिकाऱ्यांना हा धक्का दिला आहे. राज्य शासनाचे सहसचिव माधव वीर यांनी काढलेल्या आदेशामुळे अनेक अधिकाऱ्यांना आपले सध्याचे कार्यालय सोडावे लागणार आहे.
या अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी जाण्यासाठी कमी मुदत दिली आहे. येत्या १७ एप्रिलपर्यंत त्यांना नवीन जागेवर रुजू व्हावे लागणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांना हा धक्का आहे.
पुणे विभागातील 13 तहसीलदारांच्या बदल्या शिंदे-फडणवीस सरकारने केल्या आहेत. या सर्व जणांना 17 तारखेपर्यंत नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश सहसचिव माधव वीर यांनी काढले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव, मावळ, वेल्हा ,मुळशी या पाच तालुक्यातील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.
मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील तहसीलदार संवर्गातील एकूण 32 जणांच्या बदल्या करण्यात आल्याचे आदेश पत्रक शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडून काढण्यात आले आहे. यात मावळ तालुक्याचे सध्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची थेट गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका तहसीलदार पदी बदली झाली आहे.
विक्रम देशमुख असणार नवे तहसीलदार….
मधुसूदन बर्गे यांची बदली होत असल्याने त्यांच्या जागी कोण येणार, याची सर्वत्र चर्चा होत असताना विक्रम देशमुख हे मावळचे नवे तहसीलदार असतील असे समजत आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…