Categories: Uncategorized

आणखी एक भारतीय वंशाचा व्यक्ती बनला ‘या’ समृद्ध देशाचा राष्ट्रपती

महाराष्ट्र 14 न्यूजभारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षणमुगररत्नम पुढील सहा वर्ष सिंगापूरचं नेतृत्व करणार आहेत. सिंगापूरच्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी ७० टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवलाय.

 भारतीय वंशाचे थर्मन षणमुगररत्नम सिंगापूरचे नवे राष्ट्रपती बनले. शनिवारी जाहीर झालेल्या निकालानुसार, त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत ७०.४ टक्के मतांनी विजय मिळवला. षण्मुगररत्नम यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीत दोन चिनी वंशाच्या उमेदवारांचा पराभव केला. विद्यमान राष्ट्रपती मॅडम हलीमह याकोब यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ १३ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्या सिंगापूरच्या पहिल्या महिला आणि एकूण आठव्या राष्ट्रपती होत्या.

सिंगापूरचे तिसरे भारतीय वंशाचे अध्यक्ष : ६६ वर्षीय थर्मन षण्मुगररत्नम सिंगापूरचे तिसरे भारतीय वंशाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. ‘सिंगापूरच्या लोकांनी दिलेल्या भरघोस समर्थनामुळे मी खरोखरच नम्र झालो आहे. हे एक मत केवळ माझ्यासाठी नाही, तर ते सिंगापूरच्या भविष्यासाठी आहे’, असं ते म्हणाले. ‘माझी मोहीम आशावाद आणि एकतेवर आधारित होती.

तमिळ वंशाचे सिंगापूरीयन आहेत : २५ फेब्रुवारी १९५७ रोजी सिंगापूरमध्ये जन्मलेले थर्मन हे तमिळ वंशाचे सिंगापूरीयन आहेत. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केलीय. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. थर्मन षण्मुगररत्नम यांनी २००१ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ सत्ताधारी पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी (PAP) सोबत विविध मंत्री पदांवर काम केलं आहे.

राजकारणात मोठा अनुभव : थर्मन यांनी २०११ ते २०१९ दरम्यान सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि २०१९ ते २०२३ दरम्यान मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री म्हणून काम केलं आहे. २००३ मध्ये ते कॅबिनेटमध्ये शिक्षण मंत्री म्हणून नियुक्त झाले. २००८ पर्यंत ते या पदावर होते. ते २००७ ते २०१५ दरम्यान वित्त मंत्री, २०११ ते २०१२ दरम्यान मनुष्यबळ मंत्री आणि २०१५ ते २०२३ दरम्यान सामाजिक धोरण समन्वय मंत्री होते.अनेक गैर सरकारी संस्थांमध्ये काम केलंय : थर्मन यांनी अनेक गैर सरकारी संस्थांमध्येही काम केलंय. ते सिंगापूर इंडियन डेव्हलपमेंट असोसिएशन (SINDA) च्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना त्यांच्या कामांसाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जून २०२३ मध्ये त्यांनी सरकारमधील त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा देत २०२३ च्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवार होण्याचा इरादा जाहीर केला. जुलैमध्ये त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या मोहिमेची औपचारिक सुरुवात केली होती.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

2 days ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

1 week ago

जीवनात प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून भंडारा डोंगर येथील मंदिर उभारणीसाठी एक कोटींची देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ :  जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…

3 weeks ago

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…

3 weeks ago